(पालघर) भीमा कोरेगाव विजयस्तंभाचा कायमस्वरूपी मनाई हुकूम न्यायालयीन प्रकरणाचा निकाल नुकताच लागला असून हा निकाल केवळ कायमस्वरूपी मनाई हुकूम एवढ्यापुरताच मर्यादित असून न्यायालयाने जमिनीचा ताबा हा माळवदकर कुटुंबाकडे ठेवला असून या पूर्वीसुद्धा ताबा हा माळवदकर कुटुंबाकडे होता आणि आता सुद्धा ताबा त्यांच्याकडे ठेवलेला असून यात नवीन काहीच नाही मालकी हक्क मात्र जयस्तंभ या नावानेच आहे तरी निकालात अनेक त्रुटी आहेत तसेच भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती या प्रतिवादींवर न्यायालयाने जो अन्याय केला आहे त्याविरोधात भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीने मुंबईमध्ये उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्याची तयारी केलेली असून पुणे जिल्हा न्यायालय मध्ये सुद्धा अपील करण्यासाठी प्रयत्न करणार आहे अशा प्रकारची माहिती भीमा कोरेगाव विजयस्तंभ संविधानात्मक न्यायालयीन लढा जनजागृती अभियान या कार्यक्रमात भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष व कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी केले.
पुढे अभंग असे म्हणाले की जागेचा ताबा हा माळवदकर कुटुंबाकडे ठेवला असला तरी सरकारने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ती जागा ताब्यात घ्यावी व भीमा कोरेगाव विजयस्तंभ आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी समितीच्या वतीने केली असून या या संबंधात सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार संजय शिरसाट साहेब यांची मंत्रालयात भेट घेतली असून त्या प्रकारचं निवेदन महाराष्ट्राचे राज्यपाल मुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांना देण्यात आलेले आहे भीमा कोरेगाव विजयस्तंभ आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावे असा सरकारवर दबाव टाकण्यासाठी आंबेडकरी समाजातील सर्व राजकीय सामाजिक धार्मिक व इतर क्षेत्रातील संघटनांनी एकत्र येऊन या लढ्याला साथ द्यावी अशा प्रकारची विनंती आंबेडकरी समाजाला दादाभाऊ अभंग यांनी केलेली आहे.
कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती पालघर जिल्ह्याच्यावतीने पालघर येथे २७/९/२०२६ रोजी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण, ताबा व मालकी हक्क या विषयावर जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले होते त्यावेळी आयोजकांनी सन्मान केला व उपस्थितांना भीमा कोरेगाव विजयस्तंभ न्यायालयीन लढ्याची माहिती देऊन पुढील रणनीती ठरवण्यात आली. यावेळी विचारपीठावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाचे पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव, कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे उपाध्यक्ष रतन अस्वरे, कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय धावारे, मुख्य समन्वयक अतिश खराटे उपस्थित होते..कार्यक्रमाचे अध्यक्ष कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे पालघर जिल्हा अध्यक्ष किरण जाधव होते तर सूत्रसंचालन जिल्हा सचिव मिलिंद लोखंडे यांनी केले…कार्यक्रमाला सर्व पक्षीय नेते व धार्मिक व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे पदाधिकारी दीपक गायकवाड, नागसेन गायकवाड, चेतन गायकवाड, संजय जाधव महेश शेलार दीपक काकडे, भीमराव गाडे, निलेश गवांडे व कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे जिल्हा व तालुका पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
