कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या कार्यक्रम समितीच्या मुख्य संयोजक पदावर चंद्रकांतदादा जगताप यांची सर्वानुमते निवड…

Share


मुंबई: भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हा न्यायालय लढा सध्या दिवाणी न्यायालय पुणे व मुंबई उच्च न्यायालय येथे सुरू असून या न्यायालय लढाईची जनजागृती व्हावी म्हणून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती संपूर्ण भारतभर कार्यक्रम करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर १ जानेवारी १९२७ साली ऐतिहासिक विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी भीमा कोरेगाव या ठिकाणी आले होते त्याला १ जानेवारी २०२७ रोजी १०० वर्ष पूर्ण होत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भीमा कोरेगाव येथील मानवंदनेला १०० वर्ष म्हणजे शताब्दी वर्ष असल्याने पूर्ण महाराष्ट्रामध्ये व देशभर कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती जनजागृती अभियान अंतर्गत १०० कार्यक्रम घेणार असून या कार्यक्रमाचे संयोजन कसं करावं यासाठी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीने एक कार्यक्रम संयोजन समिती गठित केली असून या समितीच्या प्रमुख मुख्य संयोजक पदी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांतदादा जगताप यांची सर्वानुमते ऑनलाइन बैठकीत एकमताने त्यांची निवड केली आहे. या समितीची रचना, पुढील कार्यक्रम व ध्येय धोरण हे चंद्रकांतदादा जगताप जाहीर करतील असे कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या ऑनलाइन बैठकीत सर्वानुमते मान्य करण्यात आले. कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे उपाध्यक्ष चंद्रकांतदादा जगताप यांची कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या कार्यक्रम संयोजन समितीच्या मुख्य संयोजकपदी सर्वानुमते निवड झाल्याबद्दल त्यांना समितीच्या वतीने सर्व पदाधिकारी यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *