डोंबिवली: भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क न्यायालयीन व प्रशासकीय लढा दादाभाऊ अभंग लढत असून या लढ्यामध्ये ते आता एकटे नाहीत तर संपूर्ण कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती ही मैदानात उतरलेली असून हा न्यायालयीन लढा कुठल्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी सर्वतोपरी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि या ऐतिहासिक लढ्यात दादाभाऊ अभंग यांना आम्ही शेवटपर्यंत साथ देणार आहोत अशा प्रकारचा ठाम विश्वास कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष सुबोध भारत यांनी डोंबिवली येथे व्यक्त केला.
शनिवार दिनांक २६ जुलै २०२५ रोजी डोंबिवली येथे भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती व कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांच्या अध्यक्षतेखाली एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये भीमा कोरेगाव विजयस्तंभाचे अतिक्रमण, जागेचा मालकी हक्क व न्यायालय लढाई या संबंधी सखोल चर्चा करण्यात आली. हा लढा समाजाभिमुख व्हावा म्हणून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती अभियान राबविण्यात येणार असून जिल्हा, तालुका व शहर कार्यकारिणीची बांधणी करण्यात येत आहे. या ऐतिहासिक लढ्यात सामील व्हावे अशा प्रकारचे आवाहन सर्वांना करण्यात आले. समितीची आगामी काळातील ध्येय धोरणे ठरविण्यात आली. एक मोठी व्यापक बैठक मुंबईत घेण्याचे ठरविण्यात आले. संपूर्ण ताकदीने कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती यापुढील काळात लढा देऊन भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण मुक्त करण्याच्या निश्चय या बैठकीत करण्यात आला व तशा प्रकारची आखणी करण्यात आली. या बैठकीला कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग, कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुबोध भारत, कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अशोक भोसले, कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे महाराष्ट्र प्रदेश संघटक केतन रोकडे व ठाणे जिल्हा संघटक पराग मेंढे हे उपस्थित होते. यावेळी सर्वांनी मिळून एकमुखाने ठरविले की आता आपण ही लढाई कुठल्याही प्रकारे शेवट पर्यंत जिंकायची व निर्णायक विजय मिळवायचा असा बैठकीत ठाम विश्वास सर्वांनी व्यक्त करण्यात आला. या सर्वांचे दादाभाऊ अभंग यांनी या ऐतिहासिक लढ्यात सहभागी झाल्याबद्दल स्वागत केले व आभार मानले.
