मुंबई : कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती पदाधिकारी व हितचिंतक यांची ऑनलाइन ZOOM बैठक गुरुवार दिनांक २ जुलै २०२६ रोजी पार पडली. या बैठकीला सर्व कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे पदाधिकारी आणि हिंतचिंतक उपस्थित होते. या बैठकीला कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग हे भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क न्यायालयीन लढा या विषयावर मार्गदर्शन केले. बैठकीच्या सुरुवातीलाच कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रतन अस्वारे यांना समितीच्या वतीने वाढदिवसानिमित्त समितीच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या. या ऑनलाइन बैठकीला चंद्रकांतदादा जगताप, अनिल डोंगरदिवे, भरत टपाल, वाय.आर.लोंढे, adv. महेंद्र भिंगारदिवे, अशोक भोसले, संजय धावारे, किरण जाधव, प्रकाश सरदार, भास्कर मेश्राम, संजय जाधव, अरविंद तायडे,दीपक गायकवाड, मिलिंद लोखंडे, प्रदीप, नन्नावरे, धम्मपाल ढवळे, adv. आकाश जाधव, भीमराव गाडे, संदेश मोरे, तृषभ आव्हाड, सुमेध गरुड, विकास जाधव, ज्ञानेश्वर पालवे, राजू रोकडे, सुजय जाधव, निकिता पोळ, वाल्मीक चौधरी, यशवंत खरात, विलास काळे, कुणाल बागुल, जयेंद्र गायकवाड, महावीर कांबळे, मंगलभाई जाधव, लकी जाधव, दिलीप धनगर, अनंता जाधव, संजय जाधव, भास्कर महाले, मजरभाई पठाण, भीमराव गाडे, सन्नी भोईर, अनंता जाधव, सुनील कांबळे, दिनेश वाघचौरे आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मिटिंगचे सूत्रसंचालन संजय जाधव यांनी केले व आभार ही त्यांनीच मानले.
पुढील ऑनलाईन मीटिंग प्रत्येक पंधरा दिवसांनी होईल असे सर्वानुमते संमत झाले.
टीप: १) बातमीत टाकलेली नावे ही पदाच्या क्रमानुसार नसून जसे मिटिंगमध्ये जॉइन झाले तशी टाकल्याने कोणी ही माझे नाव वर किंवा खाली असे मनात बाळगू नये. चुकून कोणाचं नाव राहिले असेल तर चूक भूल द्यावी घ्यावी पुढील वेळेस आठवणीने टाकले जाईल.
२) ज्यांनी मीटिंग मध्ये जॉइन होताना नाव टाकले नाही त्यांची नावे माहीत नसल्याने बातमीत आली नाही पुढील वेळेस जॉइन होताना आपली नावे टाकावी.
