भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण जनजागृती अभियान तसेच विविध कार्यक्रमांसाठी दादाभाऊ अभंग धुळे जिल्ह्याच्या दोन दिवसीय (३० व ३१ जुलै) दौऱ्यावर

Share

मुंबई: भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हा प्रशासकीय व न्यायालय लढा या विषयाची माहिती जनतेपर्यंत व्हावी व हा लढा समाजाभिमुख व्हावा यासाठी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती धुळे व नंदुरबार व यश सिद्धी माजी सैनिक संघ धुळे, नंदुरबार यांनी जनजागृती अभियान कार्यक्रम बुधवार दिनांक ३०/०७/२०२५ रोजी सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे सायंकाळी ६.०० वाजता आयोजित केला असून या कार्यक्रमासाठी भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष व कोरेगाव विभाग बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांचे भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण प्रशासकीय व न्यायालयीन लढा या विषयावरील इतिहास आणि वर्तमानाची वास्तविकता व्याख्यान होणार असून या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे धुळे जिल्हा अध्यक्ष माजी सैनिक भीमराव बोरसे व नंदुरबार जिल्हा अध्यक्ष कॅप्टन (सेवानिवृत्त) देवानंद आखाडे यांनी केले आहे.
३१ जुलै हा दिवस धुळेकरांसाठी ऐतिहासिक दिवस असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्यायालयीन कामासाठी धुळे येथे आले होते याची आठवण म्हणून धुळेकर विविध कार्यक्रम राबवितात.३१ जुलै रोजी सकाळी ९.०० प्रत्येक वर्षी धुळे,नंदुरबार येथील माजी सैनिक व आंबेडकरी अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालतात यावर्षी दादाभाऊ अभंग या काकार्यक्रमाला उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पद स्पर्शाने पुनीत झालेल्या संदेश भूमीला सकाळी १०.०० वाजता भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या धुळे भेटीचे औचित्य साधून खान्देश तसेच गुजरात व मध्यप्रदेश मधून असंख्य आंबेडकरी अनुयायी लांडोर बंगला येथे येऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतात त्या सर्व आंबेडकरी अनुयायांची गाठभेट घेऊन भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क न्यायालयीन लढा याची जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी ६.०० वाजता संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती धुळे, या समितीचे अध्यक्ष आनंद सैंदाणे यांच्या वतीने भगवान बुद्ध मूर्ती वितरण सोहळा व संदेश मेळावा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला विशेष उपस्थितीत म्हणून दादाभाऊ अभंग उपस्थित राहणार आहेत.
भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हा प्रशासकीय व न्यायालयीन लढा लढणारे दादाभाऊ अभंग दोन दिवसांच्या धुळे जिल्हा दौऱ्यावर असून या विषयाची सखोल माहिती करून घेण्यासाठी आपण भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हा प्रशासकीय व न्यायालयीन लढा या जनजागृती कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती चे धुळे जिल्हा अध्यक्ष माजी सैनिक भीमराव बोरसे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *