भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालय लढ्यात सर्वांनी साथ द्यावी…. दादाभाऊ अभंग

Share

धुळे: भीमा कोरेगाव विजयस्तंभ हा आपल्या पूर्वजांच्या शौर्याचे प्रतीक असून हा विजयस्तंभ सध्या अतिक्रमणीत असून विजयस्तंभाची प्रशासकीय व न्यायालय लढाई सध्या सुरू आहे. ही प्रशासकीय व न्यायालय लढाई सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन हा लढा दिला तर भीमा कोरेगाव चा विजयस्तंभ अतिक्रमण मुक्त होईल म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण प्रशासकीय व न्यायालय लढ्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे, एकत्रितपणे आपण हा लढा देऊया, सर्वांनी एकत्र या व सर्वांनी या लढ्याला साथ द्या असे आवाहन भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती व कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी धुळे येथे आयोजित केलेल्या जनजागृती अभियान कार्यक्रमात केले.
कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती धुळे, नंदुरबार व यश सिद्धी सेवा संघ धुळे, नंदुरबार यांच्या संयुक्त यांच्या विद्यमाने भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण जागेचा न्यायालयीन व प्रशासकीय लढ्याची जनजागृती व्हावी म्हणून धुळे येथील सैनिक कल्याण कार्यालय येथे दिनांक ३० जुलै २०२५ रोजी जनजागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍडव्होकेट मधुकर भिसे होते. दादाभाऊ अभंग यांनी भीमा कोरेगावचा इतिहास व भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण कसे झाले व त्याची आजची परिस्थिती काय आहे हे सर्व पुराव्यांसह कागदपत्रांच्या आधारे न्यायालयीन लढ्याची माहिती उपस्थितांना दिली. तसेच या लढ्यात आपण कसे लढलो पाहिजे आपली पुढील दिशा काय पाहिजे याची माहिती दिली. यश सिद्धी सेवा संघ यांच्या वतीने दादाभाऊ अभंग यांना सुभेदार रामजी सपकाळ साहेब जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे धुळे जिल्हा अध्यक्ष भीमराव बोरसे यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक राजेंद्र थोरात यांनी केले. आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते राज चव्हाण व रवी मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती धुळे व नंदुरबार तसेच यशसिद्धी सैनिक सेवा संघ यांचे सदस्य यांनी खूप मेहनत घेतली त्यात रविकांत खंडारे, जयवंत नेमाने, रोहिदास बैसाणे, शेनपडू पवार, आत्माराम वाघ, गंगाराम निकम, गोरख मंगळे, भदंत मोरे, कांतीलाल अहिर, निंबा आखाडे, सुभाष सूर्यवंशी रामचंद्र जाधव या सर्वांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *