पुणे: पुणे शहर जिल्हा काँग्रेसच्या विधी, मानवाधिकार व माहिती अधिकार विभागाच्यावतीने मंगळवार दि. ५ ऑगस्ट २०२५ रोजी, मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या समर्थनार्थ पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. हेमंत झंझाड यांना निवेदन देण्यात आले. निवेदन ॲड. राहुल ढाले (अध्यक्ष, पुणे शहर जिल्हा काँग्रेस विधी विभाग) यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी पुढील मान्यवर अधिवक्ते उपस्थित होते त्यात ॲड. अनिल कांकरिया, ॲड. शाहिद अख्तर, ॲड. फैयाज शेख, ॲड. संतोष जाधव, ॲड. प्रकाश शितोळे, ॲड. विठ्ठल आरूडे, ॲड. चंद्रशेखर जाधव, ॲड. बाळासाहेब बावने, ॲड. सुरेश देवकर, ॲड. विद्या पेळपकर, ॲड. अतुल गुंड पाटील, ॲड. राशिदा सय्यद, ॲड. सतीश संचेती, ॲड. विजय तिकोने, ॲड. लक्ष्मण जगधने उपस्थित होते. उपस्थित सर्व अधिवक्ते यांचे आभार ॲड. राहुल ढाले यांनी आभार मानले.
