भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालय लढ्याला सर्वांनी साथ द्या…अण्णासाहेब रोकडे… संध्याताई केतन रोकडे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त न्यायालय लढ्यासाठी दिले धम्मदान….

Share

कल्याण: भीमा कोरेगाव विजयस्तंभ आपल्या पूर्वजांच्या शौर्याचे प्रतीक असून सध्या विजयस्तंभ येथे अतिक्रमण झाले असून त्याची भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती व कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती काम करीत असून या न्यायालय लढ्याला सर्वांनी साथ द्यावी असे रिपब्लिकन पक्षाचे नेते पॅंथर अण्णासाहेब बोकडे यांनी आयु संध्याताई केतन रोकडे यांच्या वाढदिवसानिमित्त आवाहन केले. आयु. संध्याताई केतन वानखेडे यांचा वाढदिवस ६ ऑगस्ट २०२५ रोजी मलंगवाडी (कल्याण) येथे संपन्न झाला या कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त संध्याताई केतन रोकडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त भिमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढ्याला धम्मदान रिपब्लिकन नेते आण्णासाहेब रोकडे यांच्या हस्ते दिले समितीच्या वतीने दादाभाऊ अभंग यांनी स्वीकारले यावेळी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष केतन रोकडे उपस्थित होते. या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आष्टी तालुका अध्यक्ष अशोक भाऊ साळवे, मिरजगाव समाजसेविका रेखाताई घोडके, देवी निमगाव कडा नगरसेवक युवराज साळवे, युवा शिक्षण सम्राट राहुल कासारे, भरत जाधव, हर्षल साळवी, पराग मेंढे, मयुरेश तरे, दीपेश गायकवाड, प्रथमेश पवार, निशांत म्हात्रे, ज्योतीताई गायकवाड, आशाताई ओव्हाळ, संगीता दामोदर, श्याम रोकडे, रवी रोकडे, कैलास गरुड, सुनील भोसले, सुमनताई चौरे, मनोज घुसळे, प्रीतीताई शिंदे,नीतू ताई तुपेरे, राजेश शिंदे व सर्व रोकडे परिवार मित्रमंडळी नातेवाईक यांनी आयु. संध्याताई केतन रोकडे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी रोकडे कुटुंबियांकडून ऍडव्होकेट साहिल केतन रोकडे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *