चेंबूर: वैशाली बुद्ध विहार वर्षावास: २०२५ निमित्त भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती व कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष प्रसिद्ध स्तंभलेखक व राजकीय विश्लेषक आयु.दादाभाऊ अभंग यांचे वर्षावास निमित्त फुले शाहू आंबेडकर चळवळ आणि जयस्तंभाची सद्यस्थिती या विषयावर जाहीर व्याख्यान रविवार दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी वैशाली बुद्ध विहार, कुकरेजा वसाहत, नागाबाबा नगर, वाशिनाका,चेंबूर मुंबई ४०००७४ येथे रात्री ८.०० वाजता आयोजित केले आहे. दादाभाऊ अभंग हे भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण प्रशासकीय व न्यायालयीन लढत असल्याने त्या विषयाची ते सर्व पुराव्यासह जनजागृती करणार असून भीमा कोरेगाव विजयस्तंभाची न्यायालय लढाई व सद्यस्थिती तसेच फुले, शाहू, आंबेडकर चळवळीची सध्याची स्थिती या विषयावर देखील आपले विचार मांडणार आहेत. तरी या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन वैशाली बुद्ध विहार समिती चे अध्यक्ष : आयु. अशोक काळे. उपाध्यक्ष : रंगराव म्होळे, सचिव : साहेबराव लोंढे, कार्याध्यक्ष : मुकुंद लोंढे, खजिनदार : प्रल्हाद कांबळे.
क्रियाशील उपासक : दासू गायकवाड, अमर गायकवाड, सुमित सरवदे, प्रशांत निकम, विशाल भंडारे, गोपीनाथ जावळे, उत्तम चोपडे, श्रीकांत जगताप, ऋषीकेश वाघमारे, निकिता पोळ, पद्मिनी गायकवाड, राहूल गायकवाड, उमेश कांबळे, दिलीप घोलप, महावीर कांबळे, आणि बौद्धचार्य श्रीपाल धारपवार यांनी केले आहे
