चेंबूर: आपल्या पूर्वजांच्या शौर्याचे प्रतीक असलेला भीमा कोरेगावचा विजयस्तंभ हा अतिक्रमणित असून विजयस्तंभच्या जागेचा व विजय स्तंभाच्या मालकीचा लढा सध्या न्यायालयात प्रलंबित आहे प्रशासकीय व न्यायालयीन लढा आपण प्रत्येकानी आपला स्वतःचा लढा म्हणून संघटितपणे लढला पाहिजे जर आपण हा न्यायालयीन लढा जर संघटितपणे लढलो तर आपला विजय नक्कीच होईल म्हणून प्रत्येकाने या लढ्यात सहभागी झाले पाहिजे आणि ही आपली सामूहिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. हा लढा समाजाभिमुख करण्यासाठी या लढ्याची जनजागृती होणे अपेक्षित आहे म्हणून आपल्या तालुक्यात, शहरात व जिल्ह्यात जनजागृती अभियान राबविले पाहिजे यासाठी हा लढा आपण संघटितपणे लढलो पाहिजे म्हणून आपण या लढ्यात सामील व्हा असे आवाहन भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष व कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी चेंबूर येथे केले.
वैशाली बुद्ध विहार वर्षावास २०२५ निमित्त भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती व कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग अभंग यांचे वर्षावास निमित्त फुले, शाहू, आंबेडकर चळवळ आणि जयस्तंभाची सद्यस्थिती या विषयावर जाहीर व्याख्यान रविवार दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी वैशाली बुद्ध विहार चेंबूर येथे संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांना अभिवादन करून धम्म वंदना घेऊन करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अणुशक्ती नगर तालुका अध्यक्ष महावीर कांबळे यांनी केले. कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे मुंबई सचिव विलास काळे यांनी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण या विषयावरील अत्यंत जोषपूर्ण गीत गाऊन सर्वांच्या मनात स्फूर्ती भरली. यानंतर दादाभाऊ अभंग यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार वैशाली बुद्ध विहार समितीच्यावतीने करण्यात आला. फुले शाहू आंबेडकर चळवळ व भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण प्रशासकीय व न्यायालयीन विषयावर या विषयावर दादाभाऊ अभंग यांनी सर्व पुराव्यांसह सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते ऍडव्होकेट निलेश भोसले, आर. पी.आय चे नेते बाळासाहेब बनसोडे, सामाजिक कार्यकर्त्या आयु. वैशालीताई जगताप, कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे मुंबई सचिव विलास काळे, ईशान्य मुंबई संघटक राज वाघमारे, घाटकोपर पूर्व तालुका अध्यक्ष कुणाल बागुल, चेंबूर तालुका अध्यक्ष जयेंद्र गायकवाड, चेंबूर तालुका पदाधिकारी भगवान कांबळे, सुमेध गरुड, सुनील खैरनार तसेच संतोष पवार, अभय जितेंद्र प्रसाद, शरद शिर्के,लक्ष्मण साळवे, कुकरेजा वसाहत नागाबाबा नगर, म्हाडा कॉलनी, आर.एन.पार्क, सुरक्षा वसाहत, सम्राट सहकारी गृह संस्थेतील बौद्धजन पंचायत समितीचे महिला आणि पुरुष कार्यकर्ते इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष : आयु. अशोक काळे, दासू गायकवाड, महावीर कांबळे, उत्तम चोपडे, गोपीनाथ जावळे, अमर गायकवाड, सुमित सरवदे, राहुल गायकवाड, श्रीकांत जगताप, विशाल भंडारे, दिलीप घोलप, ऋषिकेश वाघमारे, उमेश कांबळे, पद्मिनीताई गायकवाड, निकिता पोळ, बौद्धाचार्य आयुष्यमान श्रीपाल धारपवार यांनी प्रचंड मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दासू गायकवाड यांनी केले.
