डोंबिवली: डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत पारधे यांची मुलगी भारती हिचा थैलेसीमिया या आजाराने दुःखद निधन झाले. या दुःखद निधनाने पारधी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला पण हे दुःख बाजूला ठेवून भारतीसाठी काय अडचणी आल्या त्याचा संपूर्ण अनुभव हा सूर्यकांत पारधे यांना आला होता म्हणून आपल्या मुलींसाठी ज्या अडचणी आल्या त्या इतरांच्या वाट्याला येऊ नये. या आजारात रक्त हे खूप महत्वाचे आहे रक्ताशिवाय या आजारावर मात करता येत नाही म्हणून भारती नावाची संस्था नोंदणीकृत करून भारती हिचा जन्मदिनी प्रत्येक वर्षाला रक्तदान शिबिर आयोजित करून थॅलेसिमिया या रुग्णांना हातभार लागावा म्हणून भारती फाउंडेशन व सूर्यकांत पारधे आणि त्यांचे सर्व सहकारी रक्तदान या सर्वोच्च दानाचे कार्य करतात हे अत्यंत कौतुकास्पद आहे असे उदगार भारती फाउंडेशन आणि इनरव्हिल क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ज्येष्ठ पत्रकार आणि निर्णायक एल्गार चे संपादक दादाभाऊ अभंग यांनी डोंबिवली येथे काढले.
कालकथित भारती सूर्यकांत पारधे हिच्या २३ व्या जन्मदिनानिमित्त दिनांक २० ऑगस्ट रोजी भारती फॉउंडेशन आणि इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने थेलेसिमिया मुलांसाठी डोंबिवली स्वयंववर हॉल पाथर्ली इथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटन इनरव्हीलच्या अध्यक्षा शर्वरी जोशी स्वतः रक्तदान करून शिबिरास सुरुवात केली. तर भारती पारधे हिच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. इतर मान्यवरांनी पुष्प वाहिली. मागील तीन दिवस पावसामुळे हाय रेड अलर्ट असताना सुद्धा खूपच छान प्रकारे रक्तसंकलन झाले. थेलेसिमिया सोसायटीचे सचिव सुनिल वर्तक , 167वेळा रक्तदान करणारे सुरेश रेवणकर, 108 वेळा रक्तदान करणारे मंतोष मिश्रा, हे उपस्थित होते, पवन भिसे, दिनेश कांबळे, संतोष वाढवे, किरण देवघरे, समीर कांबळे यांना भारती रत्न रक्त संकलन योद्धा 2025 पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. कार्यकमास विशेष उपस्थिती म्हणून जिल्हा अध्यक्ष सदानंद थरवळ, माजी नगरसेवक मनोज घरत, प्रध्यापक शुक्राचार्य गायकवाड, वक्ते एन. एस. भालेराव, एस. बी. जाधवसाहेब, लोकनेते माणिक उघडे, बंडू घोडेसर, युवराज महाले सर, उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल समाज भूषण दादा व अभंग यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालनाची जबाबदारी अरुण दळवी यांनी पार पाडली रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी इनरव्हीलच्या शर्वरी जोशी, सचिव भक्ती भंडारी, पूनम बोबडे तर भारती फाउंडेशनचे रविकिरण मस्के सर, सूर्यकांत पारधे, सचिन साळवी, प्रशांत धिवर, आशिष कांबळे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सांगता भारती फाउंडेशनचे सचिव सचिन साळवी यांचे वडील कृष्णा सोनू साळवी यांना श्रदांजली अर्पण करण्यात आली.
सर्व रक्तदाते व या शिबिराला सहकार्य करणारे सर्व घटक यांचे मनापासून भारती फाउंडेशन या संस्थेने आभार मानले.
