कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीची Zoom बैठक रविवार दिनांक १९/१०/२०२५ रोजी संपन्न झाली. या बैठकीत भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क ही पुढील न्यायालयीन लढाई तीव्र कशी करायची तसेच हा विषय लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात जनसंपर्क अभियान कसे राबवायचे तसेच जास्तीत जास्त लोकांना या लढ्यात कसे सामावून घ्यायचं आणि हा न्यायालयिन लढा जिंकण्यासाठी काय रणनीती ठरवली पाहिजे यावर प्रामुख्याने सखोल चर्चा झाली. या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिल डोंगरदिवे यांनी सूत्रसंचालन केलं तसेच या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रतन अस्वारे, महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रवीण भोटकर, महाराष्ट्र प्रदेश संघटक व ठाणे जिल्हा प्रभारी केतन रोकडे, जळगाव जिल्हाध्यक्ष प्रकाश सरदार, पालघर जिल्हाध्यक्ष किरण जाधव, अणुशक्ती तालुका अध्यक्ष महावीर कांबळे, घाटकोपर तालुका अध्यक्ष कुणाल बागुल, जुन्नर तालुका अध्यक्ष यशवंत खरात, संस्थेचे युवा प्रचारक रुद्रा सोलापूरकर, यांनी zoom बैठकीत आपली मते मांडली. संस्थेचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी सर्वांच्या मतांचा आदर करून पुढील रणनीती ठरविण्यासाठी पुढील महिन्यात मुंबईत एक बैठक घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. अनेकाना zoom मिटिंग कसे join करायचे हे समजले नाही किंवा नेटवर्क समस्येमुळे join होता आले नाही त्यांना पुढील Zoom बैठकीत join होण्याचे आवाहन करण्यात आले. कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीची पदे देताना सर्वांना विचारून पदे दिली होती. हा कुठला राजकीय पक्ष नाही किंवा इतर संस्था किंवा संघटना नाही येथे मोठी जबाबदारी आहे कारण भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण हा आपल्या अस्मितेचा प्रश्न असून या ऐतिहासिक न्यायालयीन लढ्यात लढण्यासाठी लढाऊ कार्यकर्त्यांची फौज पाहिजे चमकेश लोकांची आवश्यकता नाही. सुरवातीला काही कार्यकर्त्यांना पदे दिली कारण ते कार्यक्षम वाटले म्हणून दिली पण त्यांची काम करण्याची इच्छा नसेल त्यांना लवकरात लवकर पदमुक्त करण्यात यावे असे अनेकांनी आपली मते मांडली सूचना मांडल्या त्यांच्या सूचनांचा आदर करून अशा पदाधिकाऱ्यांना लवकरात लवकर पदमुक्त करून तिथे नवीन कार्यक्षम कार्यकर्त्यांची पदाधिकारी म्हणून निवड करण्याचे ठरविण्यात आले. पुढील दिशा ठरविण्यासाठी अशा Zoom मिटिंग सतत घेण्यात याव्यात असे सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितले त्यांच्या सूचनांचा सन्मान करण्यात आला.
कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीची Zoom बैठक संपन्न पुढील रणनीती ठरवली