मुंबई: भीमा कोरेगाव विजयस्तंभ विकासासाठी सरकार अनेक वेळा निधीची घोषणा करीत असले तरी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने कसलाही विकास करता येणार नाही म्हणून प्रथम न्यायालयाचा खटला जिंकणे ही आपली सर्वांची पहिली आणि सामुहिक जबाबदारी आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हा प्रशासकीय व न्यायालयीन लढा प्रत्येक गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात व राष्ट्रीय पातळीवर जनजागृती करण्यासाठी व हा लढा समाजभिमुख व्हावा म्हणून जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. न्यायालयाचा खटला गतिमान व्हावा आणि लवकरात लवकर निकाल लागावा म्हणून या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे म्हणून कोरेगाव भीमा विजयस्तंभ बचाव समिती स्थापन करण्यात आलेली असून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे पालघर जिल्हाध्यक्ष किरण जाधव यांनी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या पालघर तालुका उपाध्यक्ष या पदावर आयु. नरेश अनंत म्हस्के यांची नियुक्ती केली असून ते मागील अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत काम करीत आहे. सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्र त्यांचं मोठं काम आहे. धार्मिक कार्यात ते अग्रेसर असून धम्माचा प्रसार आणि प्रसार करीत आहे. अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ते समाजात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे प्रबोधन करण्याचे काम करीत आहे. आयु. नरेश अनंत म्हस्के हे महाराष्ट्र शासनाच्या नागरी संरक्षण दल यात सेवा करीत असून ते भारतीय बौद्ध महासभा मागील चार वर्षापासून सरचिटणीस या पदावर कार्यरत असून महाराष्ट्र शासन (गृह) विभाग( विशेष) या शासकीय संघटनेतील मानसेवी अधिकारी म्हणून कार्यरत असून देश सेवा राष्ट्रीय सेवा करीत आहेत. ते श्रामनेर तसेच बौद्धाचार्य असून धम्माचा प्रचार करीत आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग (विशेष) नागरी संरक्षण दल जिल्हा पालघर विभागीय अधिकारी म्हणून काम करीत आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढ्यात ते मागील अनेक दिवसांपासून सहभागी आहेत. या ऐतिहासिक न्यायालय लढ्यात आयु. नरेश अनंत म्हस्के जनजागृतीचे काम तन, मन आणि आपले सर्वस्व लावून करतील अशी अपेक्षा… त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा
