मुंबई: दिनांक 12फेब्रुवारी २०२३ ला माझ्या मामीजी शांताबाई एकनाथ अवसरमोल यांनी शारीरिक दृष्ट्या आमचा शेवटचा निरोप घेतला आणि निर्वाणाच्या मार्गावर आरूढ झाल्यात.
लौकिक अर्थाने त्या माझ्या सासूबाई होत्या पण त्यांचे माझे नाते चाकोरीबद्ध जावई सासूचे नव्हते तर आई आणि मुलाचे होते. त्यांना असलेल्या चार मुलांशिवाय मी पाचवे आणि थोरले अपत्य होतो. ते नाते आम्ही जगत होतो.
मी करीत असलेल्या सामाजिक सांस्कृतिक कार्याचा त्यांना खुप अभिमान वाटायचा माझे कौतुक सतत करायच्या.
आता आता २५ डिसेंबरला त्यांचा ८४वा वाढदिवस साजरा केला तेव्हा केवढ्या तरी उत्साहित होत्या. त्यांना माझ्या नातवाचे बारसे थाटामाटात करायचे होते खुप सारे प्लॅन्स त्या करत होत्या. पण आता त्यांची सतत कमतरता भासत राहील.
२५ डिसेंबर १९३७ ला अकोला जिल्ह्यातील चींचांब्या पासून सुरू झालेला जीवन प्रवास अकोला शहर मार्गे मुंबईत स्थिरावला. आयुष्यात जेवढे काही करता येणे शक्य होते ते समाजासाठी करतं राहिल्यात.
माझ्या सासऱ्याकडून जे सामाजिक कार्य घडत होते त्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
अमेरिकेत वास्तव्य असताना तेथे आंबेडकरी समूहाला बांधून ठेवण्यात माझ्या सासु सासर्यांचा सिंहांचा वाटा होता , आहे.
बाबासाहेबांनी दिलेल्या pay back to society हा मंत्र त्यांनी पुरेपूर अमलात आणला आणि आमच्याकडून सुध्दा करवून घेत राहिलेत.
जीवनाकडे त्या खुप सकारात्मकपणे, निरोगीपणे व उदारपणे बघत होत्या.
माझे सासरे व सासू दोघेही प्रत्येक क्षण समरसून जगले.
शेवटी सामाजिक उन्नती म्हणजे तरी काय असते? प्रत्येक व्यक्ती हा समाजाचा घटक असतो. व्यक्ती कुटुंब बनवतात व कुटुंबांनी समाज बनतो, प्रत्येक कुटुंबाची एकंदरीत उन्नती म्हणजे सामाजिक प्रगती.
हया नियमानुसार त्यांची चारही मुले कार्य कर्तृत्ववान निघालेत. करुणा Apo, झाली, पूर्णिमा सीनिअर एअरपोर्ट होस्टेस बनली, अनंता Asst commissioner incometax बनला, मिलिंद मॉर्गन स्टॅन्ली USA मध्ये vp आहे नातू निखिल अमेरिकेत शिकून नोकरी करतोय अंवित यूके मध्ये शिकुन नोकरी करतो.मी युनियन बँक मध्ये DGM होतो कृतार्थ अन् यशस्वी जीवन अजून काय असते?
शहरात राहून सुद्धा ग्रामीण भागाशी असलेली नाळ त्यांनी कधीच तुटू दिली नाही.
काल हा चैत्यनदायी व सळसळणारा जीवन प्रवाह कायमचा विसावा घेण्यासाठी थांबला.
आमच्या आयुष्यात मोठी पोकळी करुन गेलात न भरणारी उणीव.
तुमच्या स्मृतीस विनम्र प्रणाम
🙏
प्रकाश लोखंडे
