मुंबई: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या निमित्ताने भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हा न्यायालयीन लढा प्रत्येक आंबेडकरी अनुयायांपर्यंत पोहचविण्यासाठी जनजागृती अभियान ६ डिसेंबर २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे राबविण्यात येणार आहे. या जनजागृती अभियान कार्यक्रमाची पूर्वतयारी बैठक कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे प्रमुख सल्लागार आयु. किसन माने यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक २४/११/२०२५ रोजी सायंकाळी ७.०० वाजता मातोश्री रमाई आंबेडकर सभागृह येथे संपन्न झाली. या बैठकीत समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी भीमा कोरेगाव विजयस्तंभ लढ्याची सद्यस्थिती याची विस्तृत माहिती दिली व जनजागृतीची आवश्यकता का आहे याचे विश्लेषण केले. यानंतर सर्व समितीच्या पदाधिकारी यांनी आपला परिचय देऊन या लढ्यात आपण शेवटपर्यंत सोबत आहोत असे. सांगितले. या बैठकीत आयु. रतन अस्वारे ( उपाध्यक्ष महा. प्रदेश), आयु. चंद्रकांतदादा जगताप (उपाध्यक्ष,महाराष्ट्र प्रदेश), आयु. अशोक जगताप, अतिशभाई खराटे (मुख्य समन्वयक), आयु. किरण जाधव (पालघर जिल्हाध्यक्ष), आयु. सरिताताई कांबळे (नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष (महिला) यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीला आयु. मोहन खंडे (मुंबई उपाध्यक्ष)
आयु. बी. एम. भालेराव (मुंबई प्रदेश संघटक), धम्मदीप बनसोडे (ईशान्य मुंबई उप अध्यक्ष), आयु. राज वाघमारे (ईशान्य मुंबई संघटक),आयु.अशोक पवार (उत्तर मध्य मुंबई जिल्हा संघटक) आयु. सुनील देठे (भायखळा तालुका अध्यक्ष) आयु. महावीर कांबळे (अणुशक्ती नगर तालुका अध्यक्ष), आयु. कुणाल बागुल (घाटकोपर तालुका पूर्व अध्यक्ष), आयु. जयेंद्र गायकवाड (चेंबूर तालुका अध्यक्ष),
आयु. सुदेश कडवे (विलेपार्ले तालुका अध्यक्ष), सुनील कांबळे विलेपार्ले तालुका संघटक, प्रकाश साळवे भायखळा तालुका उपाध्यक्ष, दीपक क्षीरसागर भायखळा तालुका सरचिटणीस, संदीप शिंदे भायखळा तालुका संघटक, शरद गायकवाड भायखळा तालुका संघटक, भाऊसाहेब वरठे अणुशक्ती नगर तालुका सेक्रेटरी, गणेश प्रभाकर ठोकळे मध्य मुंबई जिल्हा प्रसिद्ध प्रमुख, संजय खरात नवी मुंबई, गौतम कांबळे माहुल, राजेंद्र बनसोडे वडाळा, अनिल चंदनशिवे, तृषभ आव्हाड चेंबूर, सुमित थोरात घाटकोपर , सागर हिरामण गायकवाड घाटकोपर, अशोक रामजी पवार, राजेश सकपाळ, सुनील खैरनार व सुनील अभंग यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात समितीचे सल्लागार किसन माने यांनी आमची संस्था आपल्या या अस्मितेच्या लढ्यात सोबत आहे जी गरज लागेल आम्ही संस्थेच्या माध्यमातून सहकार्य करू असे आश्वासन दिले. बैठकीचे अत्यंत चांगले सूत्रसंचालन सुनील बोर्डे (मुंबई प्रदेश सरचिटणीस) यांनी केले तर बैठकीचे आयोजक मुंबई प्रदेश अध्यक्ष समाजभूषण संजय धावारे यांनी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढा जनजागृती अभियान यशस्वी करावे असे आवाहन करून सर्वांचे आभार मानले. बैठकीसाठी सभागृह उपलब्ध करुन दिल्याबद्दल कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मातोश्री रमाबाई उत्कर्ष संघ या संस्थेचे आभार मानले.
