भारतीय संविधान दिन व संविधान अमृत महोसत्व वर्ष कार्यक्रम भायखळा येथे संपन्न…..

Share

मुंबई: भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर लव्ह लेन सार्वजनिक जयंती महोत्सव समिती (रजि) यांच्या विद्यमाने २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वा. लव्ह लेन बी आय टी चाळ, भव्य पटांगण येथे संपन्न झाला . युवा कार्यकर्ते आद.संदीपजी(राजू) शिंदे यांच्या हस्ते धम्मध्वज फडकविण्यात आला. समितीचे सरचिटणीस आद.शिरीषभाई चिखलकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन अतिशय सुंदर पद्धतीने केले. संविधान अभिवादन कार्यक्रमात आद कौसल्या जगधने, आद. विद्याताई तपासे, आद. ज्योती मोहिते, जेष्ठ कार्यकर्ते आद. मोहनजी खंडे, आद.प्रकाशजी साळवे, आद.दिपकजी लोखंडे, आद.दिपकजी सोनवणे,आद.मोहनजी सोनवणे, धार्मिक विधी आद.दिपक क्षीरसागर (बौध्द उपासक) यांनी केला. त्याच प्रमाणे कोरेगाव भीमा जयस्तंभ समिती भायखळा तालुका अध्यक्ष आद. सुनिलभाऊ देठे, संघटक आद.शरद गायकवाड, आद.आशिष कांबळे व युवा कार्यकर्ते आद. कल्पेश गायकवाड इत्यादी कार्यकर्ते संविधान अभिवादन कार्यक्रमात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *