महाराष्ट्र राज्य माहिती आयोग कर्मचारी संघटनेतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

Share


मुंबई : दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य माहिती आयोग कर्मचारी संघटनेच्या द्वितीय वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंत्रालयातील नवीन प्रशासन भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन राज्याचे मा. राज्य मुख्य माहिती आयुक्त श्री.राहुल पांडे साहेब यांच्या हस्ते झाले. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः रक्तदान करून या सामाजिक उपक्रमाची प्रेरणादायी सुरुवात केली. यावेळी मा.श्री.राहुल पांडे साहेब यांनी संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व सदस्यांना शुभेच्छा देत रक्तदानाचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. तसेच काही रक्तदात्यांना त्यांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.या कार्यक्रमास मा.राज्य माहिती आयुक्त श्री. शेखर चन्ने साहेब, श्री.अशोक जाधव (प्रबंधक, लोक आयुक्त कार्यालय), श्री. नाईक साहेब (कक्ष अधिकारी), श्री. रमेश लवंडे (चेअरमन), श्री. रसाळ साहेब, श्री. शेलार साहेब, श्री. कापडी साहेब, श्री. गोटेकर साहेब, श्री. साने साहेब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच श्रीम. सविता जावळे (सचिव, मुख्यालय), श्री. अभय भंडारी (कक्ष अधिकारी), रोहिणी जाधव (उपसचिव), ज्योत्स्ना शिंदे (स्वीय सहाय्यक), श्रीम. पोळ मॅडम, श्रीमती कुलवंत मॅडम, गणेश कठाळे (कक्ष अधिकारी), प्रवीण पुणसे,श्री. महेश सांगळे (सरचिठणीस )आदी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रक्तदान शिबिरास शासकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे १५० हून अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. शासकीय सेवेत कार्यरत असतानाच सामाजिक बांधिलकी जपण्याचा संघटनेचा हा स्तुत्य उपक्रम ठरला. संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रल्हाद जोशी, संघटक सचिव श्री. दत्ता जावळे, श्री. उमेश जाधव, श्री. नरेश मुळीक, श्री. दिलखुष पाटील, श्री. नरेंद्र मोरे, श्री. वृंदावन पोकळे, श्री.रोहित जाधव, श्री. संदीप मोहिते व श्री. मिलिंद शोभने यांनी रक्तदान करून उपक्रमास पाठबळ दिले. विशेष म्हणजे श्री. दिलखुष पाटील यांचे हे बारावे रक्तदान होते.शिबीर यशस्वी पार पाडण्यासाठी श्रीम.सुवर्णा साळुंखे( खजिनदार) श्री.नागेश पवार (सह खजिनदार),श्रीम. प्रणाली परब, श्रीम.अश्विनी मयेकर, श्री. मनोज हरड, कु.गणेश महाडिक, कु.सुजल कांबळे, कु.सिद्धेश दिवटे, कु. चिराग साळुंके यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दत्ता जावळे यांनी केले. समाजहिताच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. प्रल्हाद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली व सदस्यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
महाराष्ट्र राज्य माहिती आयोग कर्मचारी संघटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *