म्युनिसिपल मजदूर संघाचे खजिनदार कामगार नेते विलास रामजी साळवे यांचे दुःखद निधन

Share


मुंबई-बुधवार २९ मार्च (प्रतिनिधी) बृहन्मुंबई महानगर पालिकेतील सफाई कामगार, कामगार, कर्मचारी, अधिकारी, अभियंते यांच्या प्रश्नांसाठी कामकाज करण्यारसाठी प्रयत्न करीत असलेल्या म्युनिसिपल मजदूर संघ या संघटनेचे अध्यक्ष आर, पी, आय,(आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या सोबत गेली २५ वर्ष खजिनदार पदावर कार्यरत असलेले युनियनचे खजिनदार , कवी, गायक, महानगर पालिकेच्या इ पश्चिम विभाग कामाठीपुरा के पी-2 याठिकाणी कामकरून सेवानिवृत्त झालेले विलास रामजी साळवे यांचे वयाच्या ६४ व्या वर्षी मंगळवार दिनांक २८ मार्च २०२३ रोजी हृदयविकाराच्या अतितीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. महापालिकेच्या सेवेत असतांना सर्व कामगारांचे संघटन करून जयंती उत्सव समिती स्थापन करून भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती शाहू महाराज, महात्माफुलें, बाबामहाराज पिर ,राष्ट्रमाता जिजाई, सावित्री माई फुले, माता रमाई यांचा जयंती उत्सव त्यांनी सहकाऱ्यांसह साजरे केले तसेच कर्मचाऱ्यांच्या अनेक आंदोलनात सहभागी झाले होते. ते माननीय नेते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. रामदासजी आठवले यांच्या सोबत युनियनचे खजिनदार म्हणून काम करीत होते .मृत्यू पश्चात पत्नी विजया, व अंजनी, तर भाचा अमर, गजानन जाधव, भाग्यश्री अमर जाधव, नातू आर्यन व राज, पुतण्या गोविंदभाऊ बाबुराव साळवे असा मोठा परिवार आहे. ते राहत असलेल्या सिद्धार्थ नगर, बापटी रोड, कामाठीपुरा मुंबई येथून त्यांची अंत्ययात्रा चंदनवाडी स्मशानभूमीत आल्यानंतर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यावेळी आर.पी.आय. (आठवले) पक्षाचे महाराष्ट्र सरचिटणीस गौतम भाऊ सोनवणे, म्युनिसिपल मजदूर संघाचे पदाधिकारी समाजभूषण प्रकाश कमळाकर जाधव , दिलीप थोरवडे, सुधाकर गायकवाड, रुपेश पुरळकर, संजय कापसे, मनोज सागरे, गौत्तम जाधव ,श्रावण मोरे, नितीन कांबळे, बबन कांबळे उर्फ डांगे, बी जी पडवळ, आत्माराम कांबळे, प्रकाश चंद्रकांत जाधव, श्याम केदार, यांच्यासहित गायिका मीनाक्षी थोरात व त्यांचे कुटुंब, गायक संगम कासारे, ई पश्चिम विभाग कामगार नितीन पवार, नितेश जाधव, महेंद्र गमरे, लक्ष्मण हेडा जाधव, मुंबई म्युनिसिपल कामगार संघाचे बाबुराव जाधव, दिपक जाधव, चंद्रकांत मोहिते, प्रदीप जाधव, विलास साळवे यांच्या मांडले गावचे समता सेवा मंडळाचे मान्यवर आदी नेते उपस्थित होते युनियनचे सरचिटणीस प्रकाश जाधव यांनी मुंबई महापालिकेतील कर्मचारी व संघटनेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *