दादाभाऊ अभंग यांचे नातेपुते (सोलापूर) येथे फुले – शाहू- आंबेडकर विचार प्रबोधन या विषयावर जाहीर व्याख्यान

Share

सोलापूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, नातेपुते यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव १ एप्रिल ते १५ एप्रिल पंधरा दिवस विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा होत असून क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्तंभलेख व राजकीय विश्लेषक तसेच भीमा- कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती (रजि.) या संस्थेचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांचे ११ एप्रिल २०२३ रोजी नगरपंचायत सभागृह, नातेपुते येथे फुले – शाहू – आंबेडकर विचार प्रबोधन या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेवक मा.सुरेंद्र (भैय्या ) सोरटे करणार असून कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मा. मामासाहेब पांढरे (उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, अकलूज) मा. महेशशेठ शेटे (व्हा. चेअरमन, रेणुका पतसंस्था) तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नातेपुते शहर अध्यक्ष रिपाई (आ) संघर्ष सोरटे भूषविणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, नातेपुते या संघटनेचे पदाधिकारी व सभासदांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *