महापुरुषांनी सर्व समाजासाठी समतेचे व विकासाचे कार्य केले…. दादाभाऊ अभंग, भीमा कोरेगाव अतिक्रमण न्यायालयीन लढ्याला सर्वांनी साथ द्या…. दादाभाऊ अभंग

Share

(नातेपुते, सोलापूर): छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठल्याही एका जातीसाठी काम न करता सकल समाजासाठी त्यांनी कार्य केले. त्यांच्या सामाजिक न्याय लढ्यामुळेच भारतात महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते व संपूर्ण देश या महामानवांचा आदर्श घेतात. महाराष्ट्र ही महापुरुषांची व परिवर्तनवादी संताची भूमी आहे परंतु काही सनातनी या देशात धर्माच्या नावाखाली घाणेरडे राजकारण करून महाराष्ट्राची पुरोगामी भूमी दूषित करण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु अशा उजव्या शक्तीला रोखण्याचे काम सर्व परिवर्तनवादी विचारधारेला मानणाऱ्या प्रत्येक भारतीयाचे काम असून अशा जातीयवादी शक्तीला संविधनावर विश्वास असणारा प्रत्येक भारतीय नागरिक रोखल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद प्रसिद्ध स्तंभलेखक आणि राजकीय विश्लेषक व निर्णायक एल्गार चे संपादक दादाभाऊ अभंग यांनी व्यक्त केला. डॉ. बाबसाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, नातेपुते यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव १ एप्रिल ते १४ एप्रिल असा चौदा दिवस विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा होत असून क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्तंभलेख व राजकीय विश्लेषक तसेच भीमा- कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती (रजि.) या संस्थेचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांचे ११ एप्रिल २०२३ रोजी नातेपुते येथे फुले – शाहू – आंबेडकर विचार प्रबोधन या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नातेपुते शहर अध्यक्ष रिपाई (आ) संघर्ष सोरटे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटन सुरेंद्र (भैय्या) सोरटे यांनी केले तर प्रमुख उपस्थितीमध्ये मा. महेशशेठ शेटे उपस्थित होते.
भीमा कोरेगाव येथील जयस्तंभ हा आंबेडकरी समाजाची अस्मिता व प्रेरणा आहे परंतु हा जयस्तंभ व आजूबाजूच्या जमिनीवर माळवदकर कुटुंबाने कब्जा केला असून १ जानेवारी शौर्य दिन कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मुंबई हायकोर्टाची परवानगी घ्यावी लागते व कोर्ट केवळ पाच दिवस कार्यक्रमास परवानगी देते व ती जागा पुन्हा माळवदकर कुटुंबासाठी देते. जयस्तंभाची मालकी हक्काची जागा असून ही माळवदकर कुटुंब शेती करून बेकायदेशीर या जागेचा वापर करून कब्जा केला आहे इतका गंभीर विषय असून ही आंबेडकरी समाजातील कुठल्याही नेत्याला, कार्यकर्त्याला किंवा समाजाला त्याचे काही देणेघेणे नाही ही मोठी खेदजनक बाब आहे. या अस्मितेच्या ऐतिहासिक स्थळाचा बेकायदेशीर एका कुटुंबाने ताबा घेतला आहे त्याकडे कुणाचे ही लक्ष नाही केवळ गाणी, डिजे मनोरंजन मध्ये समाज मश्गूल असल्यानेच माळवदकर कुटुंबाने जयस्तंभ आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरावर कब्जा केला आहे. या न्यायालयीन लढ्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रत्यक्ष या लढ्यात सामील व्हावे असे आवाहन भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी केले आहे.
या कार्यक्रमाला जनार्धन (नाना) सोरटे (मा.ग्रा.पं.सदस्य नातेपुते), महावीर बाबा साळवे (मा.सरपंच ग्रा.पं नातेपुते), पँथर श्रावण सोरटे, अमर(शेठ) सोरटे (मा. अध्यक्ष जयंती महोत्सव समिती नातेपुते), पोपट साळवे, एन के. साळवे, (जयंती उत्सव समिती अध्यक्ष), पुरोगामी बहुजन महाराष्ट्र न्युज चॅनलचे प्रमोद शिंदे, भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे हितचिंतक समाधान मोरे (इंदापूर), समीर सोरटे, (मा.ग्रा.पं सदस्य नातेपुते), अभिषेक साळवे,(सदस्य सोलापुर जिल्हा युवा मोर्चा भा. ज.पा), बंटी राजे सोरटे (कार्यध्यक्ष जयंती समिती), बुद्ध भूषण साळवे (सचिव जयंती समिती), सुगत सोरटे (उपाध्यक्ष जयंती समिती) वैभव जनार्धन सोरटे, राकेश सोरटे, रोहित सोरटे, सौरभ सोरटे, विशाल सोरटे, निखिल सोरटे तसेच महिला कार्यकर्त्या ही मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या त्यात वैशाली महावीर साळवे (मा.पं.स.सदस्या माळशिरस), मंगल समीर सोरटे, अश्विनी वैभव सोरटे, आम्रपाली बुद्धभूषण साळवे यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, नातेपुते या संघटनेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *