ऑल इंडिया एस.सी/एस.टी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन झोनल कमिटी (मध्य रेल्वे, मुंबई), तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती संपन्न……

Share

मुंबई: ऑल इंडिया एससी/ एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन झोनल कमिटी (मध्य रेल्वे, मुंबई), तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंती निमित्त दि.२१/४/२३रोजी मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुंबई मंडल रेल प्रबंधक कार्यालयापर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन च्या सर्व मंडळ व अतिरिक्त मंडळ चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबई मंडळाचे डीआरएम आयु रजनीश कुमार गोयल ह्यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन केले.
मिरणुकीनंतर मध्य रेल्वे ऑडोटोरियम हॉल येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, जेष्ठ विचारवंत सुरेश केदारे, माजी पोलीस अधीक्षक संजय अपरांती, माजी झोनल अध्यक्ष विद्याधर वाघमारे, झोनल उपाध्यक्ष मिलिंद देहाडे, झोनल उपाध्यक्ष राजेश थोरात,झोनल कार्यकारिणी सदस्य हेमंत गांधले,वाय आर लोंढे,महिला आघाडी च्या प्रमुख माधुरी पडेलकर, पुणे मंडळ चे दिनेश कांबळे, सानपाडा शाखेचे संजय तपासे आदी उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. व दिपप्रज्वलन करण्यात आले.
डॉ संजय अपरांती, सुरेश केदारे, विद्याधर वाघमारे, मिलिंद देहाड़े, शरद झोम्बड, सतिश केदारे आदींचे भाषणे झाली.सुत्रसंचालन राहुल गायकवाड़ यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे, सुचित्रा गांगुर्डे, अर्चना भुपती,नितिन कांबले, अमोल कांबले,अशोक सुरवाड़े, सचिन खरात,अतुल तायड़े,अजय वाघमारे, महेंद्र वाघमारे, शैलेन्द्र बड़ेकर, राजाराम लोटे,आशिष गमरे,नवनाथ पगारे, राहुल बोरसे,सागर गरुड़,प्रदीप गायकवाड़, रमेश पगारे,अर्जुन बागुल, रोहित भोसले, विलास कराड, सुनील सोनावणे, किशोर खंडागले, संदीप रणदिवे,एस.एस. ई. केलास गीते, दीपक अहिरे, स्मिता अवसरमल, राम सुतार इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम केले. समता कला मंच ह्यांनी सुंदर शाहिरी द्वारे प्रबोधन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *