कोरेगाव भीमा ऐतिहासिक जयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढा…येत्या रविवारी नागपूरमध्ये दादाभाऊ अभंग यांचे जाहीर व्याख्यान….

Share

नागपूर : १ जानेवारी १८१८ रोजी कोरेगाव भीमा येथे ब्रिटिश आणि पेशवे यांच्यात युद्ध झाले व या युद्धात जुलमी, अन्यायी पेशवाईचा अंत झाला. या युद्धाचे स्मरण म्हणून कोरेगाव भीमा येथे जयस्तंभ बांधण्यात आला व तिथे रखवालदार म्हणून माळवदकर ठेवण्यात आला होता याच माळवदकर कुटुंबाने ऐतिहासिक जयस्तंभ आणि जयस्तंभ परिसरातील जागेवर अतिक्रमण केले असून त्या अतिक्रमणाच्या विरोधात भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग समितीच्या माध्यमातून न्यायालय लढाई लढत आहे. ही न्यायालयीन लढाई अत्यंत व्यवस्थित सुरू असताना ज्यांनी अतिक्रमण यांनी केलं त्या माळवदकर कुटुंबातील एका सदस्यांनी काही दिवसांपूर्वी जयस्तंभ आमची खाजगी मालमत्ता आहे अशा प्रकारचे विधान केले होते तर भीमा कोरेगांव येथे लढाई झाली नाही तर चकमक झाली असे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे पुस्तक लिहिले आहे. माळवदकर कुटुंबाच्या या कृत्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. कोरेगाव भीमा येथे लढाई झाली की नाही? जयस्तंभ नेमका कुणाचा? व १ जानेवारीला जयस्तंभ परिसरात प्रवेश करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी का घ्यावी लागते? हा न्यायालयीन खटला काय आहे? हे सर्व जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रातील आंबेडकरी अनुयायांमध्ये मोठी उत्सुकता असून मागील काही दिवसांपासून याच विषयावर मुंबई मध्ये जनजागृती अभियान राबविण्यात आली. लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून ज्यांनी हे ऐकले ते सांगतात की आम्हाला हे माहीतच नाही. आम्ही फक्त १ जानेवारीला भीमा कोरेगाव येथे जातो व मानवंदना देऊन येतो. इतका भीमा कोरेगाव जयस्तंभाचा विषय गंभीर असताना माहीत नाही याचे सगळीकडे आश्चर्य व्यक्त करतात. जनजागृती अभियान नागपूरमध्ये झाले पाहिजे असे पाथर्डी चे रतीलाल क्षेत्रे गुरुजी यांनी नागपूरचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धम्मपाल आवळे यांच्याशी बोलणे करून हा जनजागृती अभियान नागपूरमध्ये घेण्याचे ठरविण्यात आले. भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांचा दिनांक १६ ते १९ फेब्रुवारी २०२४ रोजी विदर्भ दौरा असून ते विविध राजकीय, सामाजिक, धार्मिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या गाठीभेटी घेऊन भीमा कोरेगाव जयस्तंभ अतिक्रमण या विषयाची माहिती देणार आहे. रविवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता कॉन्फरन्स हॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, उरूवेला कॉलनी, वर्धा रोड, नागपूर येथे ‘भीमा कोरेगाव जयस्तंभ इतिहास आणि वर्तमानाची वास्तविकता’ या विषयावर भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांचे व्याख्यान आयोजित केले असून आपल्या सर्वांच्या अस्मितेचा विषय समजण्यासाठी व जनजागृती व्हावी म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धम्मपाल आवळे, विशाल मानकर, आशिष फुलझेले, डॉ. आर.एस. वाणे, ईस्वर कडबे,अविनाश कठाणे, व्यंकटराव चौधरी, प्रवीण गजभिये,पृथ्वी मोटघरे, नागेश बडगे, सुगंधाताई खांडेकर, कार्यक्रमाचे प्रामुख्याने आयोजन समता सैनिक दल तसेच विविध सामाजिक, धार्मिक संघटनांच्या पुरुष आणि महिला सामाजिक कार्यकर्ते यांनी आयोजन केले आहे. हा ऐतिहासिक न्यायलायीन लढा समजून घेण्यासाठी नागपूर परिसरातील सर्व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन भीमा कोरेगाव जयस्तंभ जनजागृती अभियान कृती समिती नागपूर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *