डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण निधीच्या खर्चाची माहिती न देणाऱ्या जनमाहिती अधिकारी यांची माहिती आयुक्त, महापालिका आयुक्त यांच्याकडे केली तक्रार….

Share

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबर या महापरिनिर्वाण दिनी लाखों आंबेडकर अनुयायी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमी येथे येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात. या आंबेडकरी अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महापालिका काही निधी हा सोयी सुविधांसाठी उपलब्ध करून दिला जातो. या सोयी सुविधांचे काम मनपाच्या जी (उत्तर) विभागाच्या केले जाते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या सोयी सुविधांसाठी मंजूर निधी व खर्च झालेला निधी याची माहिती जन माहिती अधिकारी यांच्याकडे माहिती अधिकार कायदा अंतर्गत मागितली तर ती माहिती सबंधित अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करतात. माहिती देणारे या विभागातून त्या विभागात पाठवतात. जन माहिती अधिकाऱ्यांची तक्रार अपिलीय अधिकाऱ्यांकडे केल्यानंतर हे अपिलीय अधिकारी सुद्धा त्या जन माहिती अधिकारी यांची बाजू घेऊन तशा प्रकारचे आदेश काढतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन हा आंबेडकरी अनुयायांच्या दृष्टीने इतका संवेदनशिल व भावनाशील असताना जीं उत्तर विभागाचे अधिकारी का दुर्लक्षित करतात याच्या मध्ये काही घोटाळा आहे की काय अशी शंका येते.. महापरिनिर्वाण दिनाच्या सर्व खर्चाची चौकशी करण्यात यावी व या खर्चाची माहिती न देणारे जन माहिती अधिकारी व इतर अधिकारी यांची चौकशी करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन मा.राज्यपाल महोदय, नगर विकास सचिव, महापालिका आयुक्तांना देण्यात आलेले असून जर आयुक्तांनी तात्काळ कारवाई केली नाही तर दादरच्या चैत्यभूमी येथे आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदन भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष, निर्णायक एल्गार चे संपादक दादाभाऊ अभंग यांनी आयुक्तांना दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *