कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व नवी मुंबई जिल्हा प्रभारी या पदावर आयु.चंद्रकांत जगताप यांची नियुक्ती जाहीर…

Share


मुंबई: भीमा कोरेगाव विजयस्तंभ विकासासाठी सरकार अनेक वेळा निधीची घोषणा करीत असले तरी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने कसलाही विकास करता येणार नाही म्हणून प्रथम न्यायालयाचा खटला जिंकणे ही आपली सर्वांची पहिली आणि सामुहिक जबाबदारी आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हा प्रशासकीय व न्यायालयीन लढा प्रत्येक गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात व राष्ट्रीय पातळीवर जनजागृती करण्यासाठी व हा लढा समाजभिमुख व्हावा म्हणून जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. न्यायालयाचा खटला गतिमान व्हावा आणि लवकरात लवकर निकाल लागावा म्हणून या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे म्हणून कोरेगाव भीमा विजयस्तंभ बचाव समिती स्थापन करण्यात आलेली असून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व नवी मुंबई जिल्हा प्रभारी या पदावर आयु. चंद्रकांत जगताप यांची नियुक्ती करण्यात आली असून ते मागील ३५ वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत काम करीत असून आंबेडकरी चळवळीतील युवा नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे ते संस्थापक अध्यक्ष असून या समितीच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी सामाजिक चळवळीत योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करीत असतात. आतापर्यंत शेकडो कार्यकर्त्यांचा त्यांनी गौरव केला आहे. एका मोठ्या राजकीय पक्षाच्या महत्वाच्या पदावर ते काम करीत आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढ्यात ते मागील काही वर्षांपासून सहभागी आहेत. या ऐतिहासिक न्यायालय लढ्यात आयु. चंद्रकांत जगताप जनजागृतीचे काम तन, मन आणि आपले सर्वस्व लावून करतील अशी अपेक्षा… त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *