मुंबई: सामाजिक कार्यकर्ते आयु. सुनिलभाऊ देठे यांच्या मातोश्री. श्रीमती सुशीलाआई देठे यांचा ७५ वा. वाढदिवस २ जून २०२५ रोजी सायंकाळी ७.०० वाजता भायखळा येथे करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यक्रमाचे अध्यक्ष आद. विलास जाधव, संयुक्त माझगांव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व आंबेगाव तालुक्याचे जेष्ठ कार्यकर्ते आद. यशवंत ओव्हाळ यांनी सुशीला आईंचा ७५ वर्षाच्या कालखंडातील प्रसंगाचा व आठवणीचा आढावा सादर केला. तद्द नंतर धार्मिक विधी बौध्दचार्य आद. दिपक क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. त्याच प्रमाणे विभागीय लोकप्रिय आमदार मा. मनोज जामसुतकर, माजी नगरसेवक सूर्यकांत पाटील, आर पी आय गवई गटाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आद. आनंद खरात, माजी नगरसेवक आद. राम सावंत, भवतु सब्ब मंगलमय संघटनेचे आद.शांतू डोळस, जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष आद. मोहन खंडे त्याच प्रमाणे इत्यादी कार्यकर्ते यांनी देखील सुशीला आईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला..कार्यक्रमास आंबेडकरी चळवळीतील उपासक उपासिका व नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्ते सुनील देठे यांनी सर्वांचे आभार मानले.
