कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या सल्लागार या पदावर ज्येष्ठ नेते आयु. किसन माने यांची नियुक्ती जाहीर

Share

मुंबई: भीमा कोरेगाव विजयस्तंभ विकासासाठी सरकार अनेक वेळा निधीची घोषणा करीत असले तरी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने कसलाही विकास करता येणार नाही म्हणून प्रथम न्यायालयाचा खटला जिंकणे ही आपली सर्वांची पहिली आणि सामुहिक जबाबदारी आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हा प्रशासकीय व न्यायालयीन लढा प्रत्येक गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात व राष्ट्रीय पातळीवर जनजागृती करण्यासाठी व हा लढा समाजभिमुख व्हावा म्हणून जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. न्यायालयाचा खटला गतिमान व्हावा आणि लवकरात लवकर निकाल लागावा म्हणून या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे म्हणून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती स्थापन करण्यात आलेली असून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या सल्लागार या पदावर ज्येष्ठ नेते आयु. किसन माने यांची नियुक्ती करण्यात आली असून ते मागील अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत कार्यरत आहेत. आयु. किसन माने आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते असून पँथर, मास मुव्हमेंट अशा अनेक संघटनांमध्ये त्यांना सक्रिय सहभाग होता व या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आंबेडकरी चळवळीत मोठे कार्य केले आहे.. चेंबूर मधील पी. एल. लोखंडे मार्गावर त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मातोश्री रमाबाई उत्कर्ष संघाची स्थापना केली आहे त्याला आता पन्नास वर्षे होत आहेत. आयु किसन माने व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मातोश्री रमाबाई उत्कर्ष संघ या संस्थेच्या माध्यमातून गरजू शालेय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संस्थेच्या माध्यमातून आर्थिक मदत केली आहे. भीमा कोरेगाव येथील १ जानेवारी शौर्यदिनाच्या कार्यक्रमाला ते १९८१ पासून जात आहे. प्रत्येक वर्षी ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ते चैत्यभूमी येथे संस्थेच्या माध्यमातून मागील ४१ वर्षापासून मोफत भोजनाची व्यवस्था करीत आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ येथे झालेले अतिक्रमण या विरोधात त्यांना प्रचंड चीड असून या आंदोलनामध्ये ते व त्यांची संस्था आणि सर्व पदाधिकारी व सदस्य सुरुवातीपासून सक्रिय आहेत. चेंबूर मध्ये किसन माने व अशोक जगताप ही सामाजिक कार्यातील जोडी मागील पन्नास वर्षापासून एकत्र आहे व हा चळवळीसाठी मोठा आदर्श आहे. महापुरुषांच्या विचारधारा समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी ते सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करतात तसेच भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढ्यात किसन माने व त्यांची संस्था सुरुवातीपासून सक्रिय सहभागी आहेत. या ऐतिहासिक न्यायालय लढ्यात आयु. किसन माने जनजागृतीचे काम तन, मन आणि आपले सर्वस्व लावून करतील अशी अपेक्षा… त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *