भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे…. दादाभाऊ अभंग कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीची ऑनलाईन मिटिंग संपन्न.

Share

मुंबई: रविवार दिनांक १५ जून २०२५ रोजी रात्री ८.०० वाजता नियोजित ठरल्याप्रमाणे कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीची ऑनलाईन मिटिंग संपन्न झाली. मिटिंग सकारात्मक व खेळीमेळीने तसेच गांभीर्यपूर्वक झाली.
मिटिंगला विविध जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
मिटिंगच्या सुरवातीला मा. दादाभाऊ अभंग यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाला याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. दादाभाऊ अभंग यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली. प्रास्ताविक कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे उपाध्यक्ष अनिल डोंगरदिवे यांनी केले, त्यानंतर दादाभाऊ अभंग यांनी पदाधिकारी यांना काही सूचना केल्या, व नंतर सर्व पदाधिकारी यांनी आपला परिचय देऊन कोरगाव भीमा जयस्तंभ अतिक्रमण मुक्त न्यायालयीन लढा हा लोकलढा कसा करता येईल यावर आपले विचार व्यक्त केले, मिटिंगसाठी मा, दादाभाऊ अभंग (अध्यक्ष, कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती) आयु अनिल डोंगरदिवे, (उपाध्यक्ष, विदर्भ प्रदेश प्रभारी, बचाव समिती कोरेगाव भीमा जयस्तंभ) , आयु प्रवीण भोटकर (महासचिव,कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती.) आयु प्रकाश सरदार (जळगाव जिल्हा अध्यक्ष, बचाव समिती कोरेगाव भीमा जयस्तंभ) आयु संतोष कर्डक, (अध्यक्ष, शहापूर तालुका,) आयु महावीर कांबळे, (मुंबई उपाध्यक्ष, कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव ) समिती, आयु. जयेंद्र गायकवाड, (अध्यक्ष चेंबूर,), आयु विनोद कांबळे (अध्यक्ष पुसद,) आयु भीमराव बोरसे (जिल्हा अध्यक्ष धुळे,) आयु राहुल वाघ, फेकरी तालुका अध्यक्ष जळगाव आयु लकी जाधव, (तालुका सचिव शहापूर,) आयु मिलिंद पवार, (जिल्हा संघटक, ठाणे,) आयु मुकेश मुन, (जिल्हा संघटक ठाणे,) इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते, मिटिंग चे हॉस्टिंग व आभार समितीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिल डोंगरदिवे यांनी केले, अध्यक्ष यांच्या अनुमती ने मिटिंग संपन्न झाली, मिटिंग मध्ये चर्चेला आलेले विषय समितीची संघटनात्मक बांधणी करणे, समितीच्या कार्याची रूपरेषा, ध्येय व उद्दिष्टे, समितीची कार्य पद्धती, उपरोक्त सर्व विषय कोरेगाव भीमा जय स्तंभ अतिक्रमण मुक्त नायायलयीन लढा आता लोक लढा व्हावे, या अनुषंगाने चर्चा करून त्यावर चिंतन व मंथन करण्यात आले, पुढील मिटिंगची वेळ आणि दिनांक लवकरच जाहीर करण्यात येईल असे सर्वानुमते ठरवण्यात आले. यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे असे समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी समितीच्या पदाधिकारी व सदस्यांना आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *