डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल दादाभाऊ अभंग यांचा भायखळा लव्हलेन ज्येष्ठ नागरिक कट्टा यांच्यावतीने सत्कार

Share

मुंबई : भिमा कोरेगाव जयस्तंभ बचाव समिती, त्याच प्रमाणे गेली १५ वर्षे भिमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण जागेचा मालकी हक्क प्रकरण न्यायालय लढाई लढणारे, आंबेडकर चळवळीतील अभ्यासू व्यक्तिमत्व, लव्हलेन माझगांव विभागातील जेष्ठ कार्यकर्ते कालकथित भगवान सोनवणे यांचे जावई, निःस्वार्थी जेष्ठ कार्यकर्ते आद. दादाभाऊ अभंग यांस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र शासनाचा समाजभूषण पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व उप मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व सामाजिक न्याय मंत्री नामदार संजय शिरसाठ यांच्या हस्ते १० जून रोजी मुंबईत्ब प्रदान करण्यात आला.
आद.अभंग साहेब यांस शुभेच्छा देताना, जेष्ठ नागरिक कट्टा लव्हलेन चे अध्यक्ष आद.मोहन खंडे, लव्हलेन विभागातील सामाजिक जेष्ठ कार्यकर्ते आद
.प्रकाशजी साळवे,आद.सिताराम कांबळे, पारनेर तालुक्याचे युवा कार्यकर्ते आद.संदीप शिंदे व समाजसेवक आद.सुनिलभाऊ देठे उपस्थित होते. यावेळी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व न्यायालयीन लढा या विषयावर बरीच चर्चा झाल्यानंतर सर्वांनी लव्हलेन भायखळा येथे भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क या न्यायालयीन लढा या विषयावर जनजागृती अभियान राबविण्याचे ठरवले..सर्वांनी मान्य केले की या विषयाची कुणालाही माहिती नाही ती माहिती करून देऊ असे सर्वांनी मान्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *