भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण विरोधी न्यायालयीन लढ्यात सर्वोतोपरी सहकार्य दादाभाऊ अभंग यांना करणार… जव्हार तालुका अध्यक्ष प्रा. वसंत धांडे सर

Share

जव्हार: भीमा कोरेगाव विजयस्तंभ हे आपल्या पूर्वजांचे शौर्याचं प्रतीक असून आज हे शौर्याच्या प्रतीक अतिक्रमणित असून आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा ऐतिहासिक वारसा आज इतरांच्या ताब्यात आहे आणि आपण आंबेडकरी चळवळ करत आहोत, जोपर्यंत भीमा कोरेगावचा विजयस्तंभ आंबेडकरी समाजाच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत जव्हार तालुका हा भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष आणि कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांच्या पाठीशी तन, मन, धन देऊन उभा राहील तसेच या न्यायालयीन लढ्याची संपूर्ण जव्हार तालुक्यामध्ये जनजागृती करण्यात येईल असा ठाम विश्वास कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे जव्हार तालुका अध्यक्ष प्रा. वसंत धांडे सर यांनी उपस्थित आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवर व्यक्त केला. दिनांक २९/८/२०२५ रोजी जव्हार मध्ये कोरेगांव भिमा जयस्तंभ बचाव समितीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण या विषयावर सविस्तर चर्चा केली. सर्वानी योग्य प्रकारे सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. तन, मन धनाने सर्व सहकार्य करण्यासाठी तयार झाले आहेत. आपल्या पूर्वजांनी जो लढा दिला त्यांची इतिहास आपण जपला पाहिजे अशी प्रामाणिक इच्छा सर्वांनी व्यक्त केली. ही बैठक कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष प्रा वसंत धांडे सर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला अनेक मान्यवर कार्यकर्ते होते त्यात राजू विष्णू जगताप, प्रभाकर जाधव, निवृत्ती यशवंत शिंदे, श्यामजी शिंदे, संतोष वाघचौरे, धर्मेंद्र गाडगे, महेंद्र जाधव पंकज मुकणे, संदीप शिंदे, विजय भिसे, प्रा वसंत धांडे, रवी तायडे उपस्थित होते. लवकरच कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे पालघर जिल्हा अध्यक्ष किरण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जव्हार मध्ये जनजागृती अभियान राबविण्यात येईल असे कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष प्रा. वसंत धांडे सर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *