कसारा प्रतिनिधी: गुरुवार दिनांक २८/८/२०२५ रोजी संतोष कर्डक यांची कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती शहापूर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वासिंद शहरांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष कार्यालयामध्ये ठाणे जिल्हा सचिव पॅंथर नेते आत्माराम पगारे व वासिंद शहर कार्यकारणीच्या वतीने त्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले सदर कार्यक्रमाला आर.पी.आय महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सुहासभाई जगताप आरपीआय महाराष्ट्र राज्याचे सचिव बाळकृष्ण गायकवाड (मामा) कसारा विभागीय अध्यक्ष आर.पी.आय राजूभाऊ उबाळे
उपाध्यक्ष सुदर्शन रूपवते आणि कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव व संवर्धन समितीचे शहापूर तालुका सचिव लकी जाधव आणि सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला. आत्माराम पगारे यांनी आपल्या संबोधन स्पर भाषणामध्ये असे आश्वासन दिले की आम्ही वासिंद शहरातून आणि संपूर्ण परिसरातून मोठी ताकद दादाभाऊ अभंग यांच्या पाठीशी उभी करू व येणाऱ्या एक जानेवारीला जास्तीत जास्त मोठ्या संख्येने कोरेगाव भीमा येथे उपस्थित राहू मा. गायकवाड मामा यांनी आपल्या मनोगतामध्ये अशी भावना व्यक्त केली की हा जो न्यायालयीन लढा शूर वीरांचे स्मारकाची जागा जपण्यासाठी दादाभाऊ अभंग यांनी उभा केला आहे या लढ्यामध्ये आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातून दादाभाऊ अभंग यांना ताकद देण्याचे काम करू शहापूर तालुक्याचे प्रेरणास्थान ज्येष्ठ पॅंथर नेते सुहास भाई जगताप (आर.पी.आय महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष) यांनी संबोधित करताना असे आवाहन केले की महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारत देशातील आंबेडकरी अनुयायाने शोर्या चे प्रतीक असणाऱ्या आमच्या पूर्वजांच्या स्मारकाची जागा जर कोणी गिळंकृत करत असेल तर ते सहन केले जाणार नाही. दादाभाऊ अभंग यम रिपब्लिकन पक्षाच्या वतीने एक समाज बांधव म्हणून जे पण सहकार्य लागेल ते सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत असे आवाहन केले. शेवटी कोरेगाव भीमा बचाव समितीचे शहापूर तालुका अध्यक्ष संतोष कर्डक यांनी सर्वांचे आभार मानले व भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण जागेचा मालकी हक्क या न्यायालय लढ्यात सर्वांनी सहकार्य द्यावं अशा प्रकारचे सर्वांना विनंती केली
आपल्या पूर्वजांच्या शूरवीरांच्या स्मारकाच्या व जागेचा संदर्भात जो न्यायालयीन लढा दादाभाऊ अभंग यांनी उभारला आहे तो लढा येणाऱ्या लढ्यांमध्ये सर्वात मोठा लढा असेल व त्याची इतिहासालाही नोंद घ्यावी लागेल दादाभाऊ अभंग यांच्या लढ्याची आंबेडकरी विचाराचा माणूस कोणत्याही पक्षात असला तरी त्याने आपल्या पक्षाचे काम करून समाज बांधव म्हणून शोर्या चे प्रतीक जपण्याचे कार्य करत असलेल्या दादाभाऊ अभंग यांच्या पाठीशी उभे राहावे असे वक्तव्य कोरेगाव भीमा ज्येष्ठ बचाव समितीचे शहापूर तालुका अध्यक्ष संतोष कर्डक यांनी उपस्थित समाज बांधवांना संबोधन करताना केले.
