मुंबई: भीमा कोरेगाव विजयस्तंभ विकासासाठी सरकार अनेक वेळा निधीची घोषणा करीत असले तरी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने कसलाही विकास करता येणार नाही म्हणून प्रथम न्यायालयाचा खटला जिंकणे ही आपली सर्वांची पहिली आणि सामुहिक जबाबदारी आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हा प्रशासकीय व न्यायालयीन लढा प्रत्येक गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात व राष्ट्रीय पातळीवर जनजागृती करण्यासाठी व हा लढा समाजभिमुख व्हावा म्हणून जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. न्यायालयाचा खटला गतिमान व्हावा आणि लवकरात लवकर निकाल लागावा म्हणून या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे म्हणून कोरेगाव भीमा विजयस्तंभ बचाव समिती स्थापन करण्यात आलेली असून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या तलासरी तालुका अध्यक्ष या पदावर आयु. प्रा. विश्वास वाघ यांची नियुक्ती करण्यात आली असून ते मागील अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत काम करीत आहे. सामाजिक,धार्मिक, शैक्षणिक क्षेत्र त्यांचं मोठं काम असून महापुरुषांच्या जयंती महोत्सव आयोजित केलेले आहेत. धार्मिक कार्यात ते अग्रेसर असून धम्माचा प्रसार आणि प्रसार करीत आहे. गंगाई सामाजिक व शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष असून बहुजन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना तलासरी तालुका, तसेच आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार 2020 त्यांना मिळाला आहे. अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ते काम करीत आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढ्यात ते मागील अनेक दिवसांपासून सहभागी आहेत. या ऐतिहासिक न्यायालय लढ्यात आयु. प्रा. विश्वास वाघ जनजागृतीचे काम तन, मन आणि आपले सर्वस्व लावून करतील अशी अपेक्षा… त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा
