भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण: दादाभाऊ अभंग यांच्या नेतृत्वाखाली किरण हरिभाऊ जाधव यांची यशस्वी वाटचाल…

Share

मुंबई :
कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष, व्याखाते, स्तंभलेखक आणि राजकीय विश्लेषक समाजभूषण मा. दादाभाऊ अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मा. किरण हरिभाऊ जाधव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील कार्यात नवा जोम निर्माण झाला आहे. आयु. किरण हरिभाऊ जाधव हे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय असून ते भारतीय पोस्ट विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. दलित पँथरपासून सुरु झालेली त्यांची सामाजिक वाटचाल आजही अखंड सुरू आहे. धार्मिक व सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय सहभाग, तसेच धम्मप्रसारासाठी सातत्यपूर्ण कार्य यामुळे ते खऱ्या अर्थाने भिमसैनिक म्हणून ओळखले जातात. जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी तालुकास्तरावर संघटन उभारणीस प्राधान्य दिले आहे. त्यानुसार मोखाडा तालुका अध्यक्ष : मा. ज्ञानेश्वर पालवे, विक्रमगड तालुका अध्यक्ष : मा. सुहास ढाले, वाडा तालुका अध्यक्ष : बौद्धाचार्य मा. सुजय जाधव, जव्हार तालुका अध्यक्ष : प्रा. वसंत धांडे सर,
वसई तालुका अध्यक्ष : अॅड. चेतन भोईर
तलासरी तालुका अध्यक्ष : प्रा. विश्वास वाघ सर,
या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. डहाणू, विरार, नालासोपारा (शहर), पालघर (शहर) व पालघर (ग्रामीण) या तालुक्यांमध्ये अध्यक्षपदांची नियुक्ती लवकरच केली जाणार आहे. मा. दादाभाऊ अभंग यांनी संपूर्ण महाराष्ट्रात संघटना बांधणीची जबाबदारी स्विकारली आहे. त्यात पालघर जिल्ह्यातील कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरत आहे. जिल्हाध्यक्ष मा. किरण जाधव यांच्या सक्रिय नेतृत्वाखाली तालुक्यांच्या कमिट्या जलदगतीने उभारल्या जात असून यामुळे संघटना अधिक बळकट होईल.

मी, मा. जाधव यांच्यासह सर्व नव्या तालुका अध्यक्षांचे मनःपूर्वक स्वागत व अभिनंदन करतो. मा. दादाभाऊ अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी समाजहितासाठी एकत्रितपणे कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करतो....

आपला,
रतन स. अस्वारे
उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कमेटी
कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *