डोंबिवली: भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमणाच्या विरोधात प्रशासकीय व न्यायालय लढा लढणारे तसेच विविध वृत्तपत्रातून स्तंभलेखन करून शेतकरी, कामगार, महिला, वंचित घटक, अल्पसंख्याक यांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय देणारे दादाभाऊ अभंग यांच्या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन त्यांना नुकताच डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार दिला आहे. दादाभाऊ अभंग यांनी वाल्मिकी समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित राहून सामाजिक परिवर्तन व प्रबोधनाचे कार्य केले असल्याने डोंबिवलीतील वाल्मिकी समाजातील विविध संस्था तसेच लोकजन सेवाभावी संस्था (रजि.) संस्थापक अध्यक्ष माननीय अनंतराव पो. कोम्पेली आणि भारतीय वाल्मिकी समाज सेवाभावी संस्था (रजि) राष्ट्रीय अध्यक्ष सुरेशभाई छापरवाल यांच्या विद्यमाने जाहीर सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७.०० वाजता त्रिमूर्ती नगर, कल्याण रोड, शेलार चौक, वाल्मिकी वसाहत, वाल्मिकी समाज हॉल, डोंबिवली पूर्व येथे आयोजन करण्यात आले असून हा सत्कार समारंभ अखिल भारतीय वाल्मिकी महासंघ (नवी दिल्ली) या संस्थेच्या प्रमुख राष्ट्रीय महासचिव डॉ.रेखा गोपालसिंह बहनवाल यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे आयोजक अमित राज किसन तुसामड उर्फ रोशन (डोंबिवली शहर अध्यक्ष) असून या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे अशी सदर संस्थानी विनंती केली आहे.
