कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष या पदावर आयु. समाजभूषण संजय वसंत धावारे यांची नियुक्ती जाहीर…

Share

मुंबई: भीमा कोरेगाव विजयस्तंभ विकासासाठी सरकार अनेक वेळा निधीची घोषणा करीत असले तरी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने कसलाही विकास करता येणार नाही म्हणून प्रथम न्यायालयाचा खटला जिंकणे ही आपली सर्वांची पहिली आणि सामुहिक जबाबदारी आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हा प्रशासकीय व न्यायालयीन लढा प्रत्येक गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात व राष्ट्रीय पातळीवर जनजागृती करण्यासाठी व हा लढा समाजभिमुख व्हावा म्हणून जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. न्यायालयाचा खटला गतिमान व्हावा आणि लवकरात लवकर निकाल लागावा म्हणून या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे म्हणून कोरेगाव भीमा विजयस्तंभ बचाव समिती स्थापन करण्यात आलेली असून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष या पदावर आयु. संजय वसंत धावारे यांची नियुक्ती करण्यात आली असून ते यापूर्वी मुंबई प्रदेश सरचिटणीस म्हणून काम करीत होते त्यांची काम करण्याची धडपड आणि लढाई वृत्ती यामुळे त्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. संजय धावारे मागील अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय काम करीत आहे. संजय धावारे यांनी अनेक सामाजिक संस्थांमधून सामाजिक कार्य केले आहे. आधार जन स्थापना मंच संस्थापक सरचिटणीस संपदा मंच सरचिटणीस, गुरुकुल एज्युकेशन ऍण्ड कल्चरल एन्ड ऑर्गनायझेशन सचिव, जागर लोककला आघाडी तसेच विविध संस्थावर ते पदाधिकारी आहेत त्यांच्या कामाची महाराष्ट सरकारने दखल घेऊन त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार यावर्षी देण्यात आला आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढ्यात ते मागील अनेक दिवसांपासून सहभागी आहेत. या ऐतिहासिक न्यायालय लढ्यात आयु. संजय धावारे जनजागृतीचे काम तन, मन आणि आपले सर्वस्व लावून करतील अशी अपेक्षा… त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *