..
कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीची Zoom बैठक रविवार दिनांक २६/१०/२०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क ही पुढील न्यायालयीन लढाई तीव्र कसा करायचा तसेच हा विषय लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात जनसंपर्क अभियान कसे राबवायचे तसेच जास्तीत जास्त लोकांना या लढ्यात कसे सामावून घ्यायचं आणि हा न्यायालयिन लढा जिंकण्यासाठी काय रणनीती ठरवली पाहिजे यावर प्रामुख्याने सखोल चर्चा करण्यात येईल. मागील बैठकीत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिल डोंगरदिवे यांनी सूत्रसंचालन केलं तसेच या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रतन अस्वारे, महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रवीण भोटकर, महाराष्ट्र प्रदेश संघटक व ठाणे जिल्हा प्रभारी केतन रोकडे, जळगाव जिल्हाध्यक्ष प्रकाश सरदार, पालघर जिल्हाध्यक्ष किरण जाधव, अणुशक्ती तालुका अध्यक्ष महावीर कांबळे, घाटकोपर तालुका अध्यक्ष कुणाल बागुल, जुन्नर तालुका अध्यक्ष यशवंत खरात, संस्थेचे युवा प्रचारक रुद्रा सोलापूरकर, यांनी zoom बैठकीत आपली मते मांडली होती. संस्थेचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी सर्वांच्या मतांचा आदर करून पुढील रणनीती ठरविण्यासाठी पुढील महिन्यात मुंबईत एक बैठक घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. अनेकाना zoom मिटिंग कसे join करायचे हे समजले नाही किंवा नेटवर्क समस्येमुळे join होता आले नाही यासाठी आजच्या Zoom बैठकीत join होण्याचे आवाहन करण्यात आले. कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीची पदे देताना सर्वांना विचारून पदे दिली होती. हा कुठला राजकीय पक्ष नाही किंवा इतर संस्था किंवा संघटना नाही येथे मोठी जबाबदारी आहे कारण भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण हा आपल्या अस्मितेचा प्रश्न असून या ऐतिहासिक न्यायालयीन लढ्यात लढण्यासाठी लढाऊ कार्यकर्त्यांची फौज पाहिजे. पुढील दिशा ठरविण्यासाठी Zoom बैठक आयोजित करण्यात आली असून सर्व पदाधिकारी यांनी या बैठकीत उपस्थित राहणे आवश्यक आहे. सक्रीय पदाधिकारी यांनी बैठकीत सहभागी व्हावे जे सक्रिय पदाधिकारी नाही त्यांना पदमुक्त करण्याचा विचार या बैठकीत ठरविण्यात येईल. Zoom मीटिंग ची link आणि zoom मीटिंग कशी join करायची याचा व्हिडिओ पदाधिकारी ग्रुप वर आहे तरी सर्वांनी या zoom मीटिंगला उपस्थित राहावे असे आवाहन कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रवीण भोटकर यांनी केले आहे.
