कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीची Zoom बैठक रविवार दिनांक २६/१०/२०२५ रोजी संपन्न झाली. या बैठकीत भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क ही पुढील न्यायालयीन लढाई तीव्र कशी करायची तसेच हा विषय लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात जनसंपर्क अभियान कसे राबवायचे तसेच जास्तीत जास्त लोकांना या लढ्यात कसे सामावून घ्यायचं आणि हा न्यायालयिन लढा जिंकण्यासाठी काय रणनीती ठरवली पाहिजे यावर प्रामुख्याने सखोल चर्चा झाली. समितीच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी जनजागृती अभियान राबविण्याचे ठरवण्यात आले. या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिल डोंगरदिवे यांनी सूत्रसंचालन केलं तसेच या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुबोध भारत, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांतदादा जगताप, महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रवीण भोटकर, महाराष्ट्र प्रदेश संघटक व ठाणे जिल्हा प्रभारी केतन रोकडे, महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव अशोक भोसले महाराष्ट्र प्रदेश संघटक वाय.आर.लोंढे, महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुख राजेश खिल्लारे, जळगाव जिल्हाध्यक्ष प्रकाश सरदार, पालघर जिल्हाध्यक्ष किरण जाधव, धुळे जिल्हा अध्यक्ष भीमराव बोरसे, रायगड जिल्हाध्यक्ष धम्मशील सावंत, अहिल्यानगर (उत्तर ) महिला अध्यक्ष संध्याताई खरे, अहिल्यानगर (दक्षिण) महिला अध्यक्ष संगीताताई घोडके, महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव मीराताई वासनिक, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष देवानंद आखाडे, छत्रपती संभाजी नगर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण म्हस्के, मुंबई उपाध्यक्ष विलास काळे, कल्याण शहर महासचिव राजू रोकडे, ठाणे जिल्हा संघटक मुकेश मून, ईशान्य मुंबई सरचिटणीस राजेंद्र वाघमारे, फलटण तालुका अध्यक्ष हरीश काकडे,शहापूर तालुका अध्यक्ष संतोष कर्डक, कल्याण पूर्व तालुका अध्यक्ष विशाल म्हस्के, वसई तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट चेतन भोईर, अंबरनाथ शहर अध्यक्ष संतोष पगारे, पालघर तालुका अध्यक्ष दीपक गायकवाड, तलासरी तालुका अध्यक्ष प्रा. विश्वास वाघ, घाटकोपर तालुका अध्यक्ष कुणाल बागुल, जुन्नर तालुका अध्यक्ष यशवंत खरात, कुंदन जाधव, अंजनाताई देवकांत, ऍडव्होकेट अक्षय घायल, राहुल वाघ, यांनी zoom बैठकीत सहभाग घेवून आपली मते मांडली. संस्थेचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी सर्वांच्या मतांचा आदर करून पुढील रणनीती ठरविण्यासाठी पुढील महिन्यात मुंबईत एक बैठक घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. अनेकाना zoom मिटिंग कसे join करायचे हे समजले नाही किंवा नेटवर्क समस्येमुळे join होता आले नाही त्यांना पुढील Zoom बैठकीत join होण्याचे आवाहन करण्यात आले. कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीची पदे देताना सर्वांना विचारून पदे दिली होती. हा कुठला राजकीय पक्ष नाही किंवा इतर संस्था किंवा संघटना नाही येथे मोठी जबाबदारी आहे कारण भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण हा आपल्या अस्मितेचा प्रश्न असून या ऐतिहासिक न्यायालयीन लढ्यात लढण्यासाठी लढाऊ कार्यकर्त्यांची फौज पाहिजे चमकेश लोकांची आवश्यकता नाही. सुरवातीला काही कार्यकर्त्यांना पदे दिली कारण ते कार्यक्षम वाटले म्हणून दिली पण त्यांची काम करण्याची इच्छा नसेल त्यांना लवकरात लवकर पदमुक्त करण्यात यावे असे अनेकांनी आपली मते मांडली सूचना मांडल्या त्यांच्या सूचनांचा आदर करून अशा पदाधिकाऱ्यांना लवकरात लवकर पदमुक्त करून तिथे नवीन कार्यक्षम कार्यकर्त्यांची पदाधिकारी म्हणून निवड करण्याचे ठरविण्यात आले. पुढील दिशा ठरविण्यासाठी अशा Zoom मिटिंग सतत घेण्यात याव्यात असे सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितले समितीची ही दुसरी ZOOM मीटिंग होती व पहिल्यापेक्षा या मीटिंगमध्ये उपस्थिती लक्षणीय होती. सर्वांच्या सूचनांचा सन्मान करण्यात आला. शेवटी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रवीण भोटकर यांनी सर्वांचे आभार मानले.
