अंबरनाथ: आमदार राजेश गोवर्धन मोरे यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ येथील जांभूळ गावातील एम आय डी सी चा जलशुद्धी प्रकल्पाला २७ गावातील सर्व लोकप्रतिनिधी समवेत पाहाणी दौरा केला.यावेळी ज्या उल्हासनदीतून पाणी उपसा होतो तेथे प्रत्यक्ष बघितले , तसेच गाळणी केंद्र (ट्रीटमेंट प्लांट), पाणी संकलन प्लांट, पाणी वितरण केंद्र (डिस्ट्रिब्युशन प्लांट), प्रकल्पातील या सर्व बाबी समजून घेतल्या.शिवाय लोकप्रतिनिधीसह अधिकाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
पाण्यावर प्रक्रिया करण्यात येणारा संपूर्ण प्लांट सोलारवर सुरू असल्याचे पाहिल्यावर सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक केले आणि सरकारचे पैसे बचत करण्यास तुमचा हातभार म्हणून अभिनंदन केले. भविष्यात कसे चांगल्या प्रकारे आणि मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा करता येईल यावर सविस्तर आणि सखोल चर्चा केली. यावेळी एम आय डी सीचे उप अभियंता श्री.अमोल मसुरकर यांनी सविस्तर माहिती दिली , अडचणी सांगितल्या यावेळी शिवसेना शहर सचिव तथा डोंबिवली विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष चव्हाण, माजी नगरसेवक विष्णू गायकवाड , संघर्ष समिती नेते दत्ता वझे , शिवसेना नगरसेवक मुकेश पाटील, प्रकाश म्हात्रे , लालचंद भोईर,सरपंच सुनील भोईर ,विभागप्रमुख विजय भाने, भाजपा नगरसेवक मोरेश्वर भोईर, रमाकांत पाटील, जालिंदर पाटील, गणेश भाने आणि एम आय डी सी चे इतर अधिकारी उपस्थित होते
