डोंबिवली: ओला-सुका कचरा वर्गीकरणाबाबत नागरिकांचा आवाज म्हणून लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरीक यांच्यात संयुक्त बैठक आमदार राजेश मोरे यांनी घेऊन हा प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत महानगरपालिकेचे दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी विविध दिवशी, विशिष्ठ कचरा यानुसार आदेश ‘जारी करण्यात आला होता. या आदेशानंतर डोंबिवली पूर्वेतील शिव मंदिर रोड, रघुवीर नगर, चार रस्ता ते माधव आश्रम सोसायटी परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन अडचणी व सूचना माझ्या समोर मांडल्या. या परिसरातील माधव आश्रम सोसायटी, न्यू सागर सोसायटी, राम पंचायत, शिवम शक्ती, जीवन साफल्य, छोटूसिंह अपार्टमेंट आणि ओम कार एन्क्लूज येथील चेअरमन, सेक्रेटरी, रहिवासी आणि मोठ्या प्रमाणात महिला आघाडी यांची उपस्थिती यावेळी होती.लोकप्रतिनिधी म्हणून समस्या निदर्शनास येताच, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी श्री. शरद पांढरे, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. सुरेश सालुंखे, स्वच्छता अधिकारी श्री. प्रसाद पुजारी, स्वच्छता निरीक्षक, तसेच सर्व सोसायटीचे पदाधिकारी आणि नागरिक यांच्या उपस्थितीत शिवसेना शाखा क्र. ७६, शिव मंदिर रोड येथे संयुक्त बैठक घेण्यात आली.या बैठकीत नागरिकांनी सध्याच्या आठवड्याच्या कचरा वर्गीकरण वेळापत्रकाबाबत आपली अडचण स्पष्ट करत, पूर्वीप्रमाणे, बुधवार आणि रविवार, सुका कचरा तसेच इतर दिवस…ओला कचरा, हीच पद्धत अधिक व्यवहार्य असल्याचे मत मांडले.
या चर्चेनंतर महानगरपालिकेचे अधिकारी यांनी नागरिकांच्या सूचनांना सकारात्मक प्रतिसाद दिला तसेच आमदार म्हणून सांगितले की, हा विषय महानगरपालिका आयुक्त साहेबांपर्यंत पोहोचवून योग्य तो निर्णय लवकरच घेतला जाईल, असे सर्वांना आश्वासन देण्यात आले.
या बैठकीचे आयोजन आणि पुढाकार श्री. रमेश धमापुरकर आणि श्री. गंगाराम कुहाडे (मामा) यांनी घेतला होता.
या चर्चेमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाशी संवाद साधून प्रश्न सोडविता येतो हा विश्वास निर्माण झाला आहे.
