🗓️14 नोव्हेंबर | 📍चांबळे, ता.वाडा
वाडा: साहित्यिक, पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक व कोरेगांव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष मा.दादाभाऊ अभंग व पालघर जिल्हाध्यक्ष मा.किरण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली “भीमा कोरेगाव बचाव समिती” वाडा तालुक्यात सक्रिय करण्याबद्दल चर्चात्मक बैठक मौजे चांबळे, ता.वाडा येथे दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी संपन्न झाली.या चर्चेमध्ये समितीचे वाडा तालुका अध्यक्ष आयु.सुजय जाधव (खुपरी), उपाध्यक्ष आयु.ॲड.आकाश जाधव (डाकिवली), तालुका संघटक आयु.सनी भोईर (वडवली), तालुका संघटक आयु.अमोल जाधव (चिखले), तालुका सचिव आयु.महेश जाधव (चांबळे), आयु.प्रवीण निकम (डाकिवली) व आयु.भगवान राऊत (चांबळे) आदी उपस्थित होते.सदर चर्चात्मक बैठक आयु.महेश जाधव यांच्या घरी संपन्न झाली. प्रसंगी आयु.महेश जाधव व परिवाराच्या वतीने समितीच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.या कार्यात सक्रिय होऊन कार्यरत असणारे व चर्चेसाठी निमंत्रित करणारे ॲड.आकाश जाधव व आयु.महेश जाधव यांचा समितीच्या वतीने शाल व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
