भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढा तीव्र करणार…दादाभाऊ अभंग….कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीची Zoom बैठक संपन्न पुढील रणनीती ठरवली

Share

कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीची Zoom बैठक शनिवार दिनांक १५/११/२०२५ रोजी संपन्न झाली. या बैठकीत भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क ही पुढील न्यायालयीन लढाई तीव्र कशी करायची तसेच हा विषय लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात जनसंपर्क अभियान कसे राबवायचे तसेच जास्तीत जास्त लोकांना या लढ्यात कसे सामावून घ्यायचं आणि हा न्यायालयिन लढा जिंकण्यासाठी काय रणनीती ठरवली पाहिजे तसेच ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी समितीचा स्टॉल असणार आहे त्याच्या नियोजनावर प्रामुख्याने सखोल चर्चा झाली. समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी सुरवातीला न्यायालयीन लढ्याची सद्यस्थिती व एका वर्षात हा न्यायालयाला निकाल लावायचा असल्याने आता न्यायालयीन प्रक्रिया जलद झाल्याने आपण काय केले पाहिजे यावर मार्गदर्शन केले.या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिल डोंगरदिवे यांनी सूत्रसंचालन केलं तसेच या बैठकीचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रतन अस्वारे होते. तर महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रवीण भोटकर यांनी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढा यावर सविस्तर मनोगत व्यक्त करून आभार मानले. जळगाव जिल्हाध्यक्ष प्रकाश सरदार, पालघर जिल्हाध्यक्ष किरण जाधव, अणुशक्ती तालुका अध्यक्ष महावीर कांबळे, महाराष्ट्र प्रदेश संघटक भाई वैभव वानखेडे, प्रदेश संघटक लक्ष्मीकांत बेंडसे, धुळे जिल्हाध्यक्ष भीमराव बोरसे, प्रदेश संघटक डॉ. रविंद्र घोसाळे, मुंबई अध्यक्ष संजय धावारे, वाडा तालुका उपाध्यक्ष आकाश जाधव, ठाणे जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर हिवाळे, ठाणे जिल्हा संघटक मजरखान पठाण, खालापूर तालुका अध्यक्ष जतीन मोरे, शहापूर तालुका अध्यक्ष संतोष कर्डक, मुरबाड तालुका अध्यक्ष दिलीप धनगर, adv वैभव जाधव, नितीन जाधव, राजू महाले, वाशिंद शहराध्यक्ष लकी जाधव, घाटकोपर तालुका अध्यक्ष महिला (पूर्व ) स्नेहाताई गांगुर्डे, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अनंता जाधव, पालघर जिल्हा उपाध्यक्ष संजय जाधव, बापूसाहेब वर्ठे, विलास जाधव, घाटकोपर तालुका अध्यक्ष कुणाल बागुल, जुन्नर तालुका अध्यक्ष यशवंत खरात, संस्थेचे युवा प्रचारक रुद्रा सोलापूरकर, यांनी zoom बैठकीत आपली मते मांडली. संस्थेचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी सर्वांच्या मतांचा आदर करून पुढील रणनीती ठरविण्यासाठी पुढील महिन्यात मुंबईत एक बैठक घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीची पदे देताना सर्वांना विचारून पदे दिली होती. हा कुठला राजकीय पक्ष नाही किंवा इतर संस्था किंवा संघटना नाही येथे मोठी जबाबदारी आहे कारण भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण हा आपल्या अस्मितेचा प्रश्न असून या ऐतिहासिक न्यायालयीन लढ्यात लढण्यासाठी लढाऊ कार्यकर्त्यांची फौज पाहिजे चमकेश लोकांची आवश्यकता नाही. सुरवातीला काही कार्यकर्त्यांना पदे दिली कारण ते कार्यक्षम वाटले म्हणून दिली पण त्यांची काम करण्याची इच्छा नसेल त्यांना लवकरात लवकर पदमुक्त करण्यात यावे असे अनेकांनी आपली मते मांडली. सूचना मांडल्या त्यांच्या सूचनांचा आदर करून अशा पदाधिकाऱ्यांना लवकरात लवकर पदमुक्त करून तिथे नवीन कार्यक्षम कार्यकर्त्यांची पदाधिकारी म्हणून निवड करण्याचे ठरविण्यात आले. पुढील दिशा ठरविण्यासाठी अशा Zoom मिटिंग सतत घेण्यात याव्यात असे सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितले त्यांच्या सूचनांचा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *