शहापूर : भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क न्यायालयीन लढा व शहापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांना पद वाटप कार्यमाची पूर्व तयारीसाठी १७/११/२०२५ रोजी सायंकाळी ७.३० वाजता वासिंद येथे आयु, लकी जाधव – कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती शहापूर तालुका सचिव यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीत दिनांक २१/११/२०२५ रोजी होणाऱ्या कार्यक्रमा संदर्भात चर्चा करण्यात आली ,कर्यक्रमाची रुपरेषा कशी असावी या विषयी मार्गदर्शन समितीचे शहापूर तालुका अध्यक्ष आयु,संतोषजी कर्डक व आयु, नितीन पवार तालुका उपाध्यक्ष यांनी केलं. तर उपस्थित असलेल्या धम्मबांधवानी आपली मनोगते व्यक्त केली. उपस्थिताना मा. दादाभाऊ अभंग यांनी व्हिडिओ कॉलद्वारे या लढ्याची संपूर्ण माहिती दिली. या कार्यक्रमाला वाशिंद मधील सर्व धम्म बांधवांनी उपस्थित राहून आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा इतिहास व सध्याची स्थिती समजून घेण्यासाठी या कार्याला उपस्थित राहावे असे आवाहन शहापूर तालुका सचिव लकी जाधव यांनी केले. नियोजन बैठकीला उपस्थित राहिल्याबद्दल आयु.अहिरे यांनी सर्वांचे शब्द सुमनाने आभार मानले बैठक संपली असे जाहीर करण्यात आले.
