अंबरनाथ: महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत असताना अंबरनाथ मधील नगर परिषदेची सुद्धा निवडणूक होत आहे यावर्षी अंबरनाथ नगर परिषदेचे अध्यक्ष हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असून या पदासाठी अनेकांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत भारतीय जनता पक्षातर्फे सौ तेजश्री अभिजीत करंजुले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला असून त्यांना अनेक राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे सौ तेजश्री अभिजीत करंजुले करंजुले या सीए असून उच्च विद्याविभूषित आहे.सामाजिक कार्याचे बाळकडू त्यांच्या आई वडिलांनी पाजले असल्याने सामाजिक कार्याची आवड त्यांना आहे. सौ तेजश्री अभिजीत करंजुले यांना माहेर व सासर अशी दोन्ही घराणी ही सामाजिक व राजकीय कार्य करणारी मिळाल्याने त्यांना या निवडणुकीमध्ये मोठा फायदा होणार आहे. नगराध्यक्ष निवडून आल्यावर आपण सर्व समस्या सोडवणार असून नागरिकांना कुठल्याही स्थानिक प्रश्नांना सामोरे जावे लागणार नाही असे आपण काम करू असे त्यांनी सांगितले
