अंबरनाथमधील भेंडीपाडा परिसरात भाजपची प्रचार रॅली….नागरिकांशी साधला संवाद

Share

व्हिओ
भाजपच्या उमेदवार तेजश्री करंजुले पाटील यांच्या प्रचारार्थ भेंडीपाडा परिसरात प्रचार फेरी आयोजित करण्यात आली होती. यावेळी तेजश्री करंजुले यांनी भेंडी पाडा परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांच्या अडचणी, अपुऱ्या मूलभूत सुविधा, पाणी आणि रस्त्यांचे प्रश्न जाणून घेतले. आपल्या सोबतच महिलांच्या सुरक्षिततेसाठी मी कटिबद्ध असेल असा विश्वास करंजुले यांनी परिसरातील महिला आणि तरुणींना दिला. आपल्या प्रभागाचा आणि शहराचा सर्वांगीण विकास, पारदर्शक प्रशासन आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार हाच आमचा निर्धार आहे. आणि आम्ही अंबरनाथकरांच्या अपेक्षा पूर्ण करू अशी माहिती यावेळी तेजश्री करंजुले यांनी नागरिकांना दिली. या प्रचार फेरीमुळे भेंडी पाडा परिसर भाजपमुळे झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *