भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त जनजागृती अभियान पूर्वतयारी बैठक कल्याणमध्ये संपन्न….

Share


कल्याण: भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हा प्रशासकीय व न्यायालय लढा आंबेडकरी अनुयायांमध्ये पोहोचवण्यासाठी व समाजाभिमुख करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबविण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६/१२/२०२५ या दिवशी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. या जनजागृती अभियानाची पूर्वतयारी म्हणून भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे व कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांच्या निर्देशानुसार दिनांक २०/११/२०२५ रोजी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव अशोक भोसले व कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे महाराष्ट्र प्रदेश संघटक व ठाणे जिल्हा प्रभारी केतन रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली बैठकीचे अध्यक्ष कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे कल्याण (पूर्व) तालुका अध्यक्ष विशाल मस्के होते. या बैठकीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनी जनजागृती अभियान तसंबंधीत चर्चा झाली अनेक पदाधिकाऱ्यांनी आपापली मत व्यक्त केली आणि मुंबईमध्ये हे जनजागृती अभियान राबवित असताना लोकांपर्यंत जाण्यासाठी नियोजन कसे असावे हे ठरवण्यात आले.या बैठकीला कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे ठाणे जिल्हा संघटक पराग मेढे, समितीचे हितचिंतक कुशल निकाळे,संजय राक्षसकर, कल्याण तालुका शहर महासचिव राजू रोकडे, कल्याण तालुका पूर्व महिला अध्यक्ष शोभाताई केदारे, समितीचे जिल्हा पदाधिकारी सुनील शेंडे, प्रशांत बनसोडे, सुनील डाळिंबे, मिलिंद सकपाळ, राजेंद्र नितनवरे, हरिभाऊ भालेराव, प्रशांत बनसोडे, जगदीश गायकवाड, विजय पवार, कल्याण तालुका धम्मदीप चव्हाण, कुंदन भोईर असे समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *