कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या ऐरोली विधानसभा अध्यक्ष या पदावर आयु. मिलिंद खंडू पवार यांची नियुक्ती जाहीर…

Share

मुंबई: भीमा कोरेगाव विजयस्तंभ विकासासाठी सरकार अनेक वेळा निधीची घोषणा करीत असले तरी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने कसलाही विकास करता येणार नाही म्हणून प्रथम न्यायालयाचा खटला जिंकणे ही आपली सर्वांची पहिली आणि सामुहिक जबाबदारी आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हा प्रशासकीय व न्यायालयीन लढा प्रत्येक गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात व राष्ट्रीय पातळीवर जनजागृती करण्यासाठी व हा लढा समाजभिमुख व्हावा म्हणून जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. न्यायालयाचा खटला गतिमान व्हावा आणि लवकरात लवकर निकाल लागावा म्हणून या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे म्हणून कोरेगाव भीमा विजयस्तंभ बचाव समिती स्थापन करण्यात आलेली असून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या ऐरोली विधानसभा अध्यक्ष या पदावर आयु. मिलिंद खंडू पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून ते मागील अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत काम करीत आहे. सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं मोठं काम असून महापुरुषांच्या जयंती महोत्सव आयोजित केलेले आहेत. बसपा पक्षात कॅडर कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख असून कार्यकर्ता संघटन कौशल्य त्यांच्याकडे चांगले आहे. धार्मिक कार्यात ते अग्रेसर असून धम्माचा प्रसार आणि प्रसार करीत आहे. मुंबईतील गोवंडी व आता नवी मुंबईत चांगले सामाजिक कार्य करीत असून अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ते काम करीत आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढ्यात ते मागील अनेक दिवसांपासून सहभागी आहेत. आयु. मिलिंद खंडू पवार जनजागृतीचे काम तन, मन आणि आपले सर्वस्व लावून करतील अशी अपेक्षा… त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *