डोंबिवली: दत्तनगर वसाहत BSUP 1,2,3 मधील सर्व रहिवाशांसाठी तसेच आयरे रोड परिसर येथे आज शनिवार, दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी कल्याण ग्रामीणचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या उपस्थितीत स्थानिक मान्यवर तसेच नागरिक यांच्या हस्ते संपूर्ण वसाहतीमध्ये CCTV कॅमेरे बसविण्याच्या कामाचा भव्य शुभारंभ करण्यात आला.
या उपक्रमामुळे दत्तनगर वसाहतीतील नागरिकांच्या सुरक्षेत मोठी वाढ होणार असून, समाजातील शांतता, शिस्त आणि सुरक्षिततेला एक नवी दिशा मिळणार आहे. गुन्हेगारी नियंत्रण, महिलांची सुरक्षा, पार्किंग क्षेत्र व सार्वजनिक ठिकाणांची निगराणी, या सर्व बाबींवर CCTV प्रणालीमुळे प्रभावी नियंत्रण साधले जाईल. या कार्यक्रमामध्ये श्री. राजन मराठे, मा. नगरसेवक, श्री. सूरज राजन मराठे, युवासेना विधानसभा अध्यक्ष (कल्याण ग्रामीण), श्री. सुनील भोसले, उपशहरप्रमुख, श्री. भरत पाटील, श्री. शरद केणे, अनिल केणे, श्री. किरण पाटील, विभागप्रमुख, श्री. कैलास कदम, शाखाप्रमुख, श्री. गंगाराम कु-हाडे(मामा), श्री. जीतेद्र पारटे, श्री. अर्जुन भाबड, प्रामुख्याने स्थानिक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.नागरिकांनी या महत्त्वपूर्ण उपक्रमाबद्दल मनापासून आभार व्यक्त केले.
