मुंबई: भीमा कोरेगाव विजयस्तंभ विकासासाठी सरकार अनेक वेळा निधीची घोषणा करीत असले तरी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने कसलाही विकास करता येणार नाही म्हणून प्रथम न्यायालयाचा खटला जिंकणे ही आपली सर्वांची पहिली आणि सामुहिक जबाबदारी आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हा प्रशासकीय व न्यायालयीन लढा प्रत्येक गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात व राष्ट्रीय पातळीवर जनजागृती करण्यासाठी व हा लढा समाजभिमुख व्हावा म्हणून जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. न्यायालयाचा खटला गतिमान व्हावा आणि लवकरात लवकर निकाल लागावा म्हणून या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे म्हणून कोरेगाव भीमा विजयस्तंभ बचाव समिती स्थापन करण्यात आलेली असून कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग व मुंबई अध्यक्ष संजय धावारे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे भायखळा तालुका अध्यक्ष सुनील देठे यांनी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या भायखळा तालुका उपाध्यक्ष या पदावर आयु. जगन्नाथ बाबू काळे यांची नियुक्ती करण्यात आली असून ते मागील अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत काम करीत आहे. सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्र त्यांचं मोठं काम असून महापुरुषांच्या जयंती महोत्सव आयोजित केलेले आहेत. धार्मिक कार्यात ते अग्रेसर असून धम्माचा प्रसार आणि प्रसार करीत आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढ्यात ते मागील अनेक दिवसांपासून सहभागी आहेत. या ऐतिहासिक न्यायालय लढ्यात आयु. जगन्नाथ बाबू काळे जनजागृतीचे काम तन, मन आणि आपले सर्वस्व लावून करतील अशी अपेक्षा… त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा
