मुंबई: भीमा कोरेगाव विजयस्तंभ आपल्या पूर्वजांच्या शौर्याचे प्रतीक असून हा ऐतिहासिक विजयस्तंभ व त्या परिसरातील ३ हेक्टर ८६ आर जागा एका कुटुंबाच्या ताब्यात आहे ही आपल्यासाठी अत्यंत खेदाची बाब आहे. विजयस्तंभ ही आपली अस्मिता आहे. भिमा कोरेगाव विजयस्तंभ आणि त्या परिसरातील ३ हेक्टर ८६ आर. ही जमीन जयस्तंभाच्या मालकीची असली तरी तेथील एका कुटुंबाने त्या जमिनीमध्ये इतर अधिकारांमध्ये स्वतःचं नाव बेकायदेशीररित्या घुसवून कब्जा केलेला आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमणमुक्त व्हावा म्हणून दादाभाऊ अभंग हे प्रशासकीय व न्यायालय लढाई लढत असून त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे त्यांना माझी पूर्ण साथ आहे या लढत मी सहभागी आहे व आंबेडकरी अनुयायांनी या अस्मितेच्या न्यायालयीन लढ्यात आपले व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेवून सहभागी व्हावे व या लढ्याला पाठबळ द्यावं असे आवाहन दलित पॅंथरचे संस्थापक, विचारवंत, आंबेडकरी चळवळीचे नेते ज. वि. पवार यांनी जनजागृती अभियान कार्यक्रमात काढले.
भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण संविधानात्मक लढा जनजागृती अभियान हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनानिमित्त मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे दिनांक ५ व ६ सिसेंबर राबविण्यात आले. या लढ्याची इत्यंभूत माहिती असलेले पत्रके समितीच्या पदाधिकारी यांनी आंबेडकर अनुयायांशी संवाद साधून हा लढा नेमका काय आहे याची माहिती समितीचे पदाधिकारी यांनी दिली. या जनजागृती कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी, सर्व जिल्हाधक्ष व कार्यकारिणी, शहर अध्यक्ष व कार्यकारिणी, तालुकाध्यक्ष व कार्यकारिणी यांनी आपल्या पूर्वजांच्या शौर्याचे प्रतीक वाचविण्यासाठी व आपली अस्मिता जिवंत राहण्यासाठी प्रचंड मेहनत घेऊन हा जनजागृती अभियान कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमाचे आयोजन कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष आयु. संजय धावारे व मुंबईतील कार्यकारणी, हितचिंतक यांनी केले होते. ५ डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण रात्रभर पालघर जिल्हा अध्यक्ष किरण जाधव व घाटकोपर तालुका संघटक अनिल चंदनशिवे यांनी जनजागृती अभियाना राबवून अनेकांशी संवाद साधून त्यांना पत्रके दिली याबद्दल समितीच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. या अभियानाला लोकांनी प्रचंड सहभाग नोंदवला अनेकांनी हा लढा समजवून घेतला आणि आम्ही या लढ्यात तुमच्या सोबत आहोत अशा प्रकारचे आश्वासन दिले. या जनजागृती अभियानामध्ये समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य सामील झाल्याबद्दल व प्रचंड मेहनत घेतल्याबद्दल व जनजागृती अभियान यशस्वी केल्याबद्दल आयोजक व मुंबई अध्यक्ष संजय धावारे, मुंबई पदाधिकारी व समन्वय समितीने सर्वांचे आभार मानले
