भीमा कोरेगाव विजयस्तंभ वाचवण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी …दादाभाऊ अभंग

Share

मुंबई: भीमा कोरेगाव ऐतिहासिक विजयस्तंभ व परिसरातील जागेवर एका कुटुंबाने अतिक्रमण करून विजयस्तंभ व त्या जागेचा कब्जा केला आहे. प्रत्येक वर्षी एक जानेवारीला शौर्यदिनाच्या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते या विजयस्तंभ व परिसरातील जागेचा न्यायालयीन लढाई दिवाणी न्यायालय पुणे व मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरू असून या न्यायालय लढ्यामध्ये आंबेडकरी समाजाने एकत्र येऊन हा विजयस्तंभ अतिक्रमणमुक्त करावा व त्याचा विकास करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती व कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी केले. अणुशक्ती नगर तालुका तालुका अध्यक्ष महावीर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली Adv. महेंद्र भिंगारदिवे यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी दादाभाऊ अभंग यांनी संपूर्ण अतिक्रमण व न्यायालय लढ्याची माहिती दिली. यावेळी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या मुंबई उपाध्यक्ष व दक्षिण मध्य मुंबई प्रभारी पदावर अँड. महेंद्र भिंगारदिवे तसेच अणुशक्ती नगर तालुका महिला अध्यक्षपदी निकिता पोळ यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. यावेळी

  1. ॲड.महेंद्र भिंगारदिवे (मुंबई उपाध्यक्ष व दक्षिण मध्य मुंबई – प्रभारी)
  2. आयुष्यमती. निकिता पोळ (अणुशक्तीनगर तालुका अध्यक्ष, महिला)
  3. आयु. महावीर कांबळे (अणुशक्तीनगर तालुका अध्यक्ष)
  4. आयु. जयेंद्र गायकवाड (चेंबूर तालुका अध्यक्ष)
  5. आयु. भाऊसाहेब वरठे (अणुशक्तीनगर तालुका सचिव)
  6. आयु. गौतम कांबळे (अणुशक्तीनगर तालुका सरचिटणीस)
  7. आयु. सुमेध गरुड (चेंबूर तालुका उपाध्यक्ष)
  8. आयु. रामदास सरोदे
  9. आयु. लक्ष्मण साळवे
  10. आयु. सुमित सरवदे
  11. आयु. अमर गायकवाड
  12. आयु.राहुल गायकवाड
  13. आयु. जितूभाऊ जाधव
  14. आयु. प्रवीण देविदास भोसले
  15. आयु. संजय सावंत
    ऐतिहासिक न्यायालय लढायला सर्वांनी साथ देणार अशा प्रकारची ग्वाही दिली आणि अणुशक्ती नगर तालुका अध्यक्ष महावीर कांबळे यांनी आभार मानून बैठकीचा समारोप केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *