मुंबई… कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती पदाधिकारी व हितचिंतक यांची ऑनलाइन ZOOM बैठक शनिवार दिनांक २७ जून २०२६ रोजी होणार असून या बैठकीला सर्व कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे पदाधिकारी आणि हिंतचिंतक उपस्थित राहणार आहे. या बैठकीला कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग हे भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क न्यायालयीन लढा याची सद्यःस्थिती मार्गदर्शन करणार आहे. बैठकीला सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रवीण भोटकर आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष समाजभूषण संजय धावारे यांनी केले आहे. या बैठकीला पदाधिकाऱ्यांनी गंभीर कारणाशिवाय गैरहजर राहिल्यास त्या पदाधिकाऱ्यांना कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या ऐतिहासिक लढ्यात स्वास्थ्य नाही असे समजून त्या पदाधिकाऱ्याला पदमुक्त करण्यात येईल व तो पदाधिकारी हा समितीचा हितचिंतक असेल असे ही त्यांनी सांगितले आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे ही विनंती
